लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय लोकप्रशासन संस्थेद्वारे दिल्या जाणारा स्वर्गीय एस. एस. गडकरी मेमोरियल इनोव्हेशन अवॉर्ड जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना जाहीर करण्यात आला. लोक प्रशासनामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत स्पीड पोस्टद्वारे ‘डायरेक्ट टू होम’ प्रमाणपत्र ४८ तासांच्या आत उपलब्ध करून देण्याच्या राज्यातील पहिल्या उपक्रमाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे.शासन आपल्या दारी या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जनतेला प्रशासनातर्फे दिले जाणारे प्रमाणपत्र नेमून दिलेल्या वेळेपेक्षा कमी दिवसांच्या आत घरपोच पोस्टसेवेद्वारे उपलब्ध करून देण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन यावर्षीचा पुरस्कार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेतर्फे जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे १६ मार्च रोजी विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.‘डायरेक्ट टू होम’ या उपक्रमांतर्गत १६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ८२ हजार ४९ प्रमाणपत्रांचे घरपोच वितरण पूर्ण झाले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची राज्यस्तरावरही दखल घेण्यात आली असून, भारतीय लोक प्रशासन संस्थेद्वारे दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्यस्तरावर दिल्या जाणाºया स्वर्गीय डॉ. एस. एस. गडकरी मेमोरियल अवॉर्ड फॉर इनोव्हेशन इन पब्लिक अॅडमिनीस्ट्रेशन २०१७ या पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची निवड केली आहे.‘डायरेक्ट टू होम’या उपक्रमासाठी गौरव नागपूर शहरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना विविध प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू विभागामध्ये यावे लागते. त्यामुळे सेतू कार्यालयात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नागरिकांना सहज, सुलभ व पारदर्शकरीत्या कमी वेळात जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व अधिवास राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतानादेखील गर्दीमुळे गैरसोयींचा सामना करावा लागत होता. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जनतेला घरपोच प्रमाणपत्र वाटपासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून स्पीड पोस्ट सेवेद्वारा जनतेला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले आहेत. १ फेब्रुवारी २०१७ पासून ८२ हजार ४९ प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत तसेच शासनाबाबतही विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 1:13 AM
भारतीय लोकप्रशासन संस्थेद्वारे दिल्या जाणारा स्वर्गीय एस. एस. गडकरी मेमोरियल इनोव्हेशन अवॉर्ड जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना जाहीर करण्यात आला. लोक प्रशासनामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत स्पीड पोस्टद्वारे ‘डायरेक्ट टू होम’ प्रमाणपत्र ४८ तासांच्या आत उपलब्ध करून देण्याच्या राज्यातील पहिल्या उपक्रमाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ठळक मुद्देभारतीय लोक प्रशासन संस्थेचा इनोव्हेशन अवॉर्ड जाहीर