लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तालुक्यातील खडका शिवारातून सोंडापार शिवारात गेलेल्या वाघाने मंगळवारच्या पहाटेला अरुण आष्टणकर यांच्या शेतातील गोऱ्ह्यावर हल्ला करून शिकार केली. बुटीबोरी वनविभागाचे क्षेत्रिय वनाधिकारी एस.डी.त्रिपाठी यांनी वाघाने गोऱ्ह्याची शिकार केल्याचे स्पष्ट केले. मात्र तेथे उपस्थित असलेल्या माकडाच्या कळपाने कोलाहल केला. त्यामुळे वाघाने शिकार केलेल्या गोऱ्ह्याला तिथेच सोडून पळ काढला. बुटीबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही.ठोकळ यांच्या नेतृत्वातील पथकाने तिथे सीसीटीव्ही लावून आपली निगराणी वाढवली आहे. वाघ पुन्हा या परिसरात शिकार करण्यासाठी परत येऊ शकतो यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. परिसरात वाघाचा वावर वाढल्यामुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिकात भीतीचे वातावरण आहे.
नागपूर जिल्ह्यात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:22 PM
नागपूर तालुक्यातील खडका शिवारातून सोंडापार शिवारात गेलेल्या वाघाने मंगळवारच्या पहाटेला अरुण आष्टणकर यांच्या शेतातील गोऱ्ह्यावर हल्ला करून शिकार केली.
ठळक मुद्देसोंडापार शिवारातील घटना