शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

काँग्रेसच्या तिकीटसाठी नागपूर जिल्ह्यातही चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 9:21 PM

शहरासोबतच जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यापूर्वी विधानसभा लढलेल्यांसह फे्रश चेहऱ्यांनीही यावेळी आपली दावेदारी सादर केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामीणमधील एकाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली नाही. असे असतानाही विधानसभा लढण्यासाठी इच्छुकांमध्ये उत्साह कायम आहे.

ठळक मुद्देजिल्हा व प्रदेश काँग्रेसकडे अर्ज सादर : उमरेडमध्ये सर्वाधिक इच्छुक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरासोबतच जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यापूर्वी विधानसभा लढलेल्यांसह फे्रश चेहऱ्यांनीही यावेळी आपली दावेदारी सादर केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामीणमधील एकाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली नाही. असे असतानाही विधानसभा लढण्यासाठी इच्छुकांमध्ये उत्साह कायम आहे.प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार, इच्छुक उमेदवारांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ येथील कार्यालयातून अर्ज घ्यायचे होते. त्यानुसार सुमारे ३० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यापैकी काहींनी भरलेले अर्ज जिल्हा काँग्रेस समितीकडे सादर केले, तर काहींनी प्रदेश काँग्रेसकडे सादर केले आहेत. उमरेड मतदारसंघासाठी गेल्यावेळी लढलेले डॉ. संजय मेश्राम यांच्यासह काँग्रेसमध्ये दाखल झालेले राजू पारवे यांनी अर्ज सादर करीत उमेदवारीवर दावा केला आहे. याशिवाय महादेव नगराळे, नत्थू लोखंडे, राहुल घरडे, प्रमोद घरडे, राजेश मेश्राम, गजानन जांभुळकर, विश्वनाथ मेंढे, जॉनी मेश्राम, प्रशांत वासुदेव ढाकणे, यशवंत नत्थूजी मेश्राम यांनीही अर्ज दाखल केले आहेत. उमरेडमध्ये इच्छुकांची मोठी रांग आहे.कामठी मतदारसंघात प्रदेश पदाधिकारी हुकूमचंद आमधरे, आबिद ताजी, प्रसन्ना तिडके, जि.प. सदस्य नाना कंभाले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य, महादेव जीभकाटे, विनोद मिसाळ, आशिष चव्हाण, फिरोज अहमद अन्सारी यांनी अर्ज भरले आहेत. रामटेकसाठी पर्यटक मित्र व काँग्रेसच्या पर्यटन सेलचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी दावा केला आहे. डॉ. अमोल देशमुख यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून अर्ज घेतलेला नाही. तर माजी सभापती सुरेश कुंभरे, दीपक पालीवाल, गज्जू यादव, सचिन किरपान यांनी अर्ज घेतले आहेत. हिंगणा विधानसभा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. मात्र, यावेळी तो काँग्रेसला मिळावा, अशी मागणी आहे. या मतदारसंघातून गेल्यावेळी लढलेल्या युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत यांच्यासह बाबा आष्टनकर यांनी दावा केला आहे. सावनेरसाठी आ. सुनील केदार यांनीही अर्ज केला आहे.मुळकांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून रामटेक मतदारसंघात तयारी चालविली आहे.मात्र, त्यांनी या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज घेतलेला नसून, ते ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. राज्यातील जिल्हाध्यक्षांवर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील निवडणुकांची जबाबदारी असते. त्यामुळे मी स्वत: दावेदारी सादर केली तर इतर मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ शकते. जिल्हाध्यक्षांनी लढावे किंवा नाही याबाबत पक्षस्तरावर निर्णय होईल. त्यानुसार आपण निर्णय घेऊ. सद्यस्थितीत पक्ष बळकट करणे हेच आपले लक्ष्य आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. विशेष म्हणजे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनीही अर्ज घेतलेला नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक