शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

वाहन विक्रीत विदर्भात नागपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:40 PM

गेल्या काही महिन्यापासून मंदीत असलेल्या वाहन उद्योगात दसरा-दिवाळीत नवचैतन्य आले. ग्राहकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची उत्साहात खरेदी केली. आरटीओ कार्यालयात चारचाकींपेक्षा दुचाकींची चारपट नोंदणी झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे मंदी दुरावल्याचे चित्र : चारचाकींपेक्षा दुचाकींची चारपट नोंदणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या काही महिन्यापासून मंदीत असलेल्या वाहन उद्योगात दसरा-दिवाळीत नवचैतन्य आले. ग्राहकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची उत्साहात खरेदी केली. आरटीओ कार्यालयात चारचाकींपेक्षा दुचाकींची चारपट नोंदणी झाल्याची माहिती आहे. विदर्भात एकूण वाहन विक्रीपैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात ३७ टक्के वाहन विक्रीची नोंद वाहन सेवा संकेतस्थळावर झाली आहे.यंदा वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त होती. विविध कंपन्यांनी राबविलेल्या आर्थिक बचतीच्या योजनांना ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कमी व्याजदराच्या योजना ग्राहकांसाठी फायद्याच्या ठरल्या. अनेकांनी आधीपासून आवडत्या वाहनांची नोंद करून दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळी शुभमुहूर्तावर वाहन घरी नेले.प्राप्त माहितीनुसार १ ते ३० ऑक्टोबर या काळात विदर्भातील ११ जिल्ह्यातील १३ आरटीओ कार्यालयांमध्ये सर्वच श्रेणीत एकूण २८,४३८ वाहनांच्या विक्रीची नोंद झाली. त्यातून शासनाला ८६ कोटी ५५ लाख ४८ हजार २११ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. विक्री झालेल्या वाहनांमध्ये २१ हजार ९३० दुचाकी, ४ हजार ३३७ चारचाकी आणि इतर वाहनांचा समावेश आहे. सर्वाधिक ४ हजार ३१२ वाहनांच्या विक्रीची नोंदणी पूर्व नागपूर उपप्रादेशिक कार्यालयात झाली. त्यामध्ये ३ हजार ३४० दुचाकी तर ५९९ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३ हजार ७९० आणि नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात २ हजार ४३३ वाहनांच्या विक्रीची नोंद करण्यात आली. वाहन नोंदणी आणि विक्रीच्या माध्यमातून तिन्ही कार्यालयाला ४० कोटी १४ लाख ८० हजार २८४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिन्याच्या प्रारंभी वाहन विक्रीचा वेग कमी होता. नंतर वाढला. विविध कंपन्यांच्या वाहनांना नागरिकांकडून जास्त मागणी असल्याचे नोंदणीवरून दिसून येते. पुढे वाहन विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.इरोज मोटर्सचे महाव्यवस्थापक सूरज भुसारी म्हणाले, यावर्षी दिवाळीत चारचाकी वाहनांना चांगला प्रतिसाद मिळाला. नागपुरात १५ कंपन्यांच्या डीलर्सच्या शोरुममधून महिन्याला जवळपास १७०० चारचाकींची विक्री होते. पण ऑक्टोबरमध्ये जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त कारची विक्रीची माहिती आहे. ह्युंडईच्या तिन्ही शोरुममध्ये जवळपास ६०० गाड्यांची विक्री झाली असून तुलनात्मकरीत्या वाढ झाली आहे. माहितीनुसार, नागपुरात मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत ५० टक्के वाटा आहे. दुचाकी गाड्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर होंडा आहे. त्यानंतर हिरो, बजाज आणि अन्य कंपन्यांच्या दुचाकी विक्रीचा समावेश आहे.

टॅग्स :two wheelerटू व्हीलरnagpurनागपूर