शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

दहावीत नागपूर विभाग तळाला; निकाल ६७.२७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 2:04 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल यंदा चक्क १८.७० टक्क्यांनी घटला.

ठळक मुद्दे१८.७० टक्क्यांनी घटला निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल यंदा चक्क १८.७० टक्क्यांनी घटला. संपूर्ण विभागाच्या निकालाची टक्केवारी ही अवघी ६७.२७ टक्के इतकीच आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील विभाग राज्यात तळाशीच आहे.विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७९ हजार ५३ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ५८ हजार ९८१ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७४.६१ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ६०.२७ टक्के इतके आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष देशपांडे रविकांत देशपांडे यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ६२ हजार ५ पैकी१ लाख ८ हजार ९७७ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’नागपूर विभागात यंदा नागपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. नागपूर जिल्ह्यातून ६१ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी ४४ हजार ९ म्हणजेच ७१.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गोंदिया जिल्ह्यातून २१ हजार ५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ हजार ४१६ म्हणजेच ६८.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली जिल्ह्याची आहे. तेथे १४ हजार ९६९ पैकी केवळ ८ हजार १८० म्हणजे ५४.६५ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारीजिल्हा                    निकाल टक्केवारीभंडारा                     ६५.९९ %चंद्रपूर                     ६५.५८ %नागपूर                    ७१.७४ %वर्धा                         ६५.०५ %गडचिरोली               ५४.६५ %गोंदिया                    ६८.४६ %

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल