लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या काही वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान मंडळातर्फे राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये ९४ कॉपीची प्रकरणे आढळली असून यामध्ये ९३ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी १५४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा कॉपीचे प्रमाण ३९ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.परीक्षा काळात मंडळातर्फे भरारी पथकांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यात येत होती. विभागात १५५ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. यातील १५४ जण दोषी आढळले, तर एका विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ४६ विद्यार्थी दोषी आढळून आले. तर मागील वर्षी सर्वाधिक कॉपी सापडलेल्या वर्धा जिल्ह्यात केवळ तीनच विद्यार्थी पकडल्या गेले.भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी कॉपीची प्रत्येकी २४ प्रकरणे आढळली होती. यंदा मात्र हे प्रमाण प्रत्येकी अनुक्रमे १० व ८ इतके आहे.नागपूर जिल्ह्यात ९ कॉपीबहाद्दर सापडले.उत्तरपत्रिकांवर आपला मोबाईल क्रमांक, गुण देण्यासाठी विनंती, धमकी इत्यादी लिहिणारे काही विद्यार्थी असतात. परीक्षा झाल्यानंतर मूल्यांकनाच्या वेळी अशी ३५ प्रकरणे आढळून आली. यातील केवळ एकच विद्यार्थी दोषी ठरला आहे.दोषींची आकडेवारीजिल्हा संख्या (२०१८) संख्या (२०१७)भंडारा १० २४चंद्रपूर ८ २४नागपूर ८ १वर्धा ३ ६०गडचिरोली ४६ १२गोंदिया १८ ३३एकूण ९३ १५४वर्षनिहाय कॉपीची प्रकरणवर्ष कॉपी२०१५ ११२२०१६ ७५२०१७ १५४२०१८ ९४
नागपूर विभागात कॉपीचे प्रमाण ३९ टक्क्यांनी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 9:54 PM
गेल्या काही वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान मंडळातर्फे राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये ९४ कॉपीची प्रकरणे आढळली असून यामध्ये ९३ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी १५४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा कॉपीचे प्रमाण ३९ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.
ठळक मुद्दे९३ कॉपीबहाद्दर दोषी : गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे