शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

बारावीमध्ये नागपूर विभागाच्या निकालात वाढ, पण राज्यात आठव्या क्रमांकावर

By आनंद डेकाटे | Published: May 21, 2024 3:58 PM

नागपूर विभागाचा निकाल ९२.१२ टक्के मागच्या वर्षीच्या तुलनेत १.७७ टक्के वाढ : विभागात गोंदिया जिल्हा अव्वल, वर्धा सर्वात कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या नागपूर विभागाचा निकाल ९२.१२ टक्के इतका लागला आहे.  मागील वर्षाच्या तुलनेत १.७७ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. परंतु, राज्यात नागपूर विभाग आठव्या क्रमांकावरच आहे. नागपूर विभागामध्ये गोंदिया जिल्हा ९५.२४ टक्क्यांनी अव्वल ठरला आहे. तर वर्धा जिल्ह्याचा निकाल ८९.४० टक्यांसह सर्वात कमी आहे.

करोना काळात मिळालेले गृह परीक्षा केंद्र, कमी अभ्यासक्रम आणि अतिरिक्त वेळ या सवलतींचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी दोन वर्षे शिक्षण मंडळाच्या मागील वर्षीच्या निकालात भरारी घेतली होती. यामुळे नागपूर विभागाच्या निकालातही वाढ झाली होती. मात्र, सवलती बंद होताच नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी कमी झाली हाेती. यंदा विभागाने काहीशी कामगिरी सुधारली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये नागपूर विभागाचा निकाल ९०.३५ टक्के होता. यात आता १.७७ टक्के वाढ होऊन ९२.१२ झाला आहे. 

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये विभागातून १ लाख ५६ हजार ३४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ५५ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४३ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९२.१२ इतकी आहे. करोना काळात नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ही ९७ टक्क्यांपर्यंत गेली होती. मात्र, दोन वर्षांपासून या सवलती बंद होताच निकालात घसरण झाली आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.०८ टक्के तर सर्वात कमी कला शाखेचा निकाल ८६.११ टक्के लागला आहे.

यंदाही मुलीच अव्वलमंगळवारी दुपारी १ वाजता राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वच विभागांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी ही मुलांच्या तुलनेत सर्वाधिक राहिली आहे. नागपूर विभागाच्या निकालात मुलांची टक्केवारी – ८९.८५ टक्के तर मुलींची टक्केवारी ९४.४६ इतकी आहे. विभागातील स्थिती एकूण नोंदणी- १,५६,३४२परीक्षा देणारे विद्यार्थी- १,५५,३७४उत्तीर्ण विद्यार्थी – १,४३,१३१एकूण टक्केवारी – ९२.१२ - 

विभागातील जिल्हानिहाय टक्केवारीगोंदिया - ९५.२४ टक्के भंडारा - ९४.६८ टक्के गडचिरोली - ९४.४२ टक्के चंद्रपूर - ९३.८९  टक्के नागपूर - ८९.९३ टक्के वर्धा - ८९.४० टक्के एकूण - ९२.१२ टक्के 

शाखानिहाय निकालविज्ञान- ९७.०८वाणिज्य – ८७.२८कला – ८६.११एमसीव्हीसी – ८७.६१आयटी – ८०.९७

टॅग्स :nagpurनागपूरResult Dayपरिणाम दिवस