लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक वादातून एका डॉक्टरची त्याची पत्नी व तिच्या कुटुंबीयांनी डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीत जखमी झालेले डॉ. अमित हे ईएनटी सर्जन असून, त्यांची पत्नी रश्मी दंत चिकित्सक आहे. त्यांना अडीच वर्षाची मुलगी आहे. पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून वाद सुरू होता. ७ मार्च रोजी रश्मी मुलीला घेऊन आपल्या माहेरी गायत्रीनगर आयटी पार्क येथे गेली होती.डॉ. अमित यांनी केलेल्या तक्रारीनुसार रविवारच्या सकाळी ११.३५ वाजता तो मुलीला घेण्यासाठी सासरी गेला होता. त्याने पत्नीला फोन करून मुलीला घेऊन खाली बोलाविले. रश्मीने मुलगी खेळत असल्याचे सांगून अमितला वर येण्यास सांगितले. अमितने घरात जाऊन मुलीला घेतले तेव्हा मुलगी रडायला लागली. तिला रडताना बघून सासरे प्रभाकर ढाले यांनी मुलीला खाली ठेवण्यास सांगितले. त्यांनी मुलीला घेऊन गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान पत्नी, सासू रुपाली व साळा हृषिकेश याने अमितची पिटाई केली. सासऱ्याने लाठीने वार करून अमितचे डोके फोडले. अमित पोलिसांना फोन करीत असल्याचे बघून त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला. या मारहाणीत अमितला चक्कर आली. त्याने पाण्याची मागणी केली. पाणी न दिल्यामुळे अमित स्वत:च्या कारमध्ये ठेवलेली पाण्याची बॉटल आणण्यासाठी कारकडे जात असताना सासूने दरवाजाला लॉक करून घेत अमितला घरातच डांबले. काही वेळानंतर प्रतापनगर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी लॉक उघडले. पोलीस अमित घाटगे यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉ. अमितच्या तक्रारीवर मारपीट व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.
नागपुरात डॉक्टरला डांबून ठेवून केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:47 AM
कौटुंबिक वादातून एका डॉक्टरची त्याची पत्नी व तिच्या कुटुंबीयांनी डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देपत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल