वसीम कुरैशी
नागपूर : दोन वर्षांपूर्वी बंद झालेले कतार एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण आता जूनपासून सुरू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणारी ही एकमात्र ‘फाईव्ह स्टार’ एअरलाईन्स आहे.
कतार एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर अल बकर २००७ ला नागपुरात आले होते. तत्कालिन नागरी उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरातून उड्डाण सुरू केले होते. काही काळानंतर हे उड्डाण बंद झाले होते. त्यानंतर २०१५ मध्ये पुन्हा सुरू झाले आणि २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात पुन्हा बंद झाले.
पूर्वी कतार एअरवेज मे २०२२ मध्ये उड्डाण सुरू करणार होते. आता जूनपासून उड्डाण सुरू करण्याची तयारी आहे. कतार नागपुरातून दोहाकरिता एअरबस-३२० विमानाने उड्डाण करणार आहे. एकूण १४४ सीटांच्या या विमानात १२ बिझनेस क्लास आणि १३२ इकॉनॉमिक क्लास सीट आहेत. विमानात मनोरंजन आणि भोजनाची सुविधा आहे. २८४० किमीच्या प्रवासासाठी ४.३० तासांचा वेळ लागतो.