लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: १३ व्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या ईव्हीएम मशीन्स मतमोजणी कक्षात नेऊन मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. यात सर्वप्रथम पोस्टल बॅलेट मोजणीत नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र फडणवीस हे पोस्टल बॅलेट मतात आघाडीवर आहेत. एकूण ७३२ पोस्टल मते आलेली आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसकडून माजी आ. आशिष देशमुख यांनी आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री राज्यभर प्रचारात व्यस्त असल्याने भाजपच्या स्थानिक टीमने धुरा सांभाळली आहे. येथे ‘ऑल इज वेल’ असल्याचा त्यांचा दावा आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची जबाबदारी असली तरी त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. मागील पाच वर्षांत येथील विकासकामांचा नियमित आढावा घेत मतदारसंघात पक्ष संघटन मजबूतीवरदेखील भर दिला. शहरासोबतच ‘होमपीच’लादेखील त्यांनी ‘स्मार्ट’ करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहनच दिले.
नागपूर दक्षिण-पश्चिम निकाल: पोस्टल बॅलेट मतात देवेंद्र फडणवीस आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 8:36 AM