लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज विभागात पारदर्शी कारभार राहावा म्हणून अनेक योजना राबवल्या जात आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली जात आहे. परंतु ग्राहकांचा त्रास मात्र कमी झाल्याचे दिसून येत नाही. तब्बल सहा महिने रिडींग न घेताच बिल पाठवण्यात आल्याची तक्रार एका महिला ग्राहकाने वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह थेट ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.हिराबाई चंद्रकांत आंबे असे या तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. हिराबाई या प्लॉट नंबर १ ओम आदरणीय सोसायटी बेसा, बेलतरोडी मार्ग येथे राहतात. त्यांचा वीज मीटरचा क्रमांक ४१३२५०५११५९३ हा आहे. मे २०१७ ते आॅक्टोबर २०१७ पर्यंत त्यांना वीज मिटरचे रिंडींग न घेताच बिल पाठवले जात आहे. या सहाही महिन्याचा वापर युनिट हे २०४ इतकेच दाखवण्यात आले आहे. हे बिल त्यांनी भरले सुद्धा. यानंतर गेल्या काही महिन्यात त्यांना अचानक मोठ्या प्रमाणावर बिल पाठवले जात आहे.गेल्या २१ फेब्रुवारी रोजी त्यांना एक नोटीस, पाठवण्यात आली. त्यात १ लाख ९७९ रुपयाची वीज बिल थकीत असून १५ दिवसात भरण्याचे निर्देश देण्यात आले. पैसै भरले नाही म्हणून मीटर कापून नेले. मुळात रिडींग न घेताच इतके बिल आलेच कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. यासंबंधात त्यांनी कार्यकारी अभियंता व ऊर्जामंत्र्यांकडेही लेखी तक्रार केली आहे.
नागपूर; रिडींग न घेताच पाठवले जात आहे वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:22 AM
तब्बल सहा महिने रिडींग न घेताच बिल पाठवण्यात आल्याची तक्रार एका महिला ग्राहकाने वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह थेट ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.
ठळक मुद्देग्राहक त्रस्तकार्यकारी अभियंत्यासह ऊर्जामंत्र्यांकडेही तक्रार