- सुमेध वाघमारे नागपूर - नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सुरू झालेल्या मतदानात इव्हीएम मशीन बंद पडल्याने लोकांना तासभर रांगेत उभे राहण्याची वेळ आली. हा प्रकार दिघोरी येथील जयमाता शाळा या मतदान केंद्रावर झाला. येथील बुथ क्रमांक २४६ येथे नागरिक सकाळी ६.३०वाजतापासून रांगेत लागले होते. मतदान ७ वाजता सुरू होणार होते. परंतु इव्हीएम मशीन सुरूच होत नव्हते. लोकांमध्ये संताप वाढला होता. माजी नगरसेवक विजय झलके यांनी यावर आक्षेप घेतला. अधिकाºयांनी तांत्रिक अडचणीचे कारण देत इव्हीएम मशीन बदलली. सकाळी ८ वाजून १० मिनीटांनी मतदान सुरू झाले. याच केंद्रावरील बुथ क्रमांक २४८ मध्येही सकाळी ७.३०वाजता अचानक इव्हीएम मशीन बंद पडले. मतदान रखडल्याने लोकांनी गोंधळ घातला. १५ मिनीटानंतर ७ वाजून ४५ मिनीटांनी पुन्हा मतदान सुरू झाले.
Nagpur: EVM मध्ये बिघाड, मतदानाला तब्बल १ तास १० मिनिटे उशीर, दिघोरी येथील प्रकार
By सुमेध वाघमार | Published: April 19, 2024 9:25 AM