लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेसबुकवर फ्रेण्डशिप करून बियाण्याच्या व्यवसायात लाखोंचा नफा मिळवण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगाराच्या टोळीने एका व्यावसायिकाला सव्वाचार लाखांचा गंडा घातला.गोकुळपेठेतील सुदामा टॉकीजजवळ राहणारे दीपक दिनेशभाई कोठारी (वय ५३) यांच्यासोबत साईनतीया माउरा (रा. ११६०, वेअर मिल सिल्वर स्पायरिंग मॅरी लॉन्ड यूएसए)हिने फेसबुकवरून फ्रेण्डशिप केली. त्यानंतर ती आणि तिचे साथीदार अनिता शर्मा (रा दिल्ली, एअर पोर्ट आॅफिस), नताशा शर्मा (रा. दिल्ली, कस्टम आॅफीस), कॅनन मॅरियन, रा. लंडन), इंटरनॅशनल कोरीअर फास्टचे धारक), मेलीस असली वलना (रा. रा. ईस्तबुल, टर्की)आणि स्वातीसिंग कपूर यांनी संगनमत करून कोठारी यांना गिफ्ट पार्सल पाठविण्याचे आमिष दाखवले. सोबतच बियाण्यांच्या व्यवसायात नफा मिळवून देण्याचेही आमिष दाखवले. कोठारी आरोपींच्या आमिषाला बळी पडले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत कोठारींनी वेगवेगळ्या खात्यात ४ लाख २० हजार रुपये जमा केले. प्रत्यक्षात आरोपींनी ना गिफ्ट पार्सल पाठवले ना बियाण्याच्या व्यवसायात नफा मिळवून दिला. प्रत्येक वेळी रक्कम जमा करण्यास आरोपी सांगत असल्याने कोठारींना संशय आला. त्यानंतर त्यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात फेसबुक फ्रेण्डने घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:35 AM
फेसबुकवर फ्रेण्डशिप करून बियाण्याच्या व्यवसायात लाखोंचा नफा मिळवण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगाराच्या टोळीने एका व्यावसायिकाला सव्वाचार लाखांचा गंडा घातला.
ठळक मुद्देनफा मिळवून देण्याचे आमिष : सव्वाचार लाख हडपले