चार दिवस सांस्कृतिक मेजवानी : मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते उद्घाटननागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फे ब्रुवारी ते २ मार्च दरम्यान यशवंत स्टेडियम येथे नागपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज, रविवारी सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. लोकमत समूहाने या महोत्सवाचे संयोजन केले आहे.चार दिवसांच्या या महोत्सवात दररोज सायंकाळी ५.३० ते १० या वेळेत विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कलाकार सादरीकरण करणार असल्याने हा महोत्सव नागपूरकरांसाठी बहारदार कार्यक्रमांची मेजवानी ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती असेल. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके असतील. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे या कार्यक्रमासाठी शासनाकडून दोन कोटींचा निधी मिळणार असून महापालिका प्रशासनाने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. झोन कार्यालयात पासेस उपलब्धनागपूर : २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात दिग्गज कवी आपल्या रचना सादर करतील. कविसंमेलनाची वेळ वाढवून मिळावी यासाठी आयोजकांचे प्रयत्न सुरू आहेत. या महोत्सवाच्या पासेस महापालिकेच्या दहाही झोन कार्यालयात कार्यालयीन वेळेत निशुल्क उपलब्ध राहतील. कार्यक्रमात लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खा. अजय संचेती, खा. अविनाश पांडे, खा. कृपाल तुमाने, विशेष अतिथी म्हणून आ. नागो गाणार, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, महापालिकेतील सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, महापालिकेतील गटनेते राजू नागूलवार, राजू लोखंडे, राहुल तेलंग, श्रावण खापेकर, किशोर कुमेरिया, गौतम पाटील, असलम खान, हरीश दिकोंडवार व धंतोली झोनच्या सभापती लता यादव, आयुक्त श्रावण हर्डीकर, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव वल्सा आर नायर सिंह, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानोटिया उपस्थित राहतील. नागपूरकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर प्रवीण दटके, नागपूर महोत्सवाचे आयोजक व स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, मार्गदर्शक आ. अनिल सोले, संयोजक नगरसेवक संदीप जोशी यांनी केले आहे. १९६५ च्या वीर सैनिकांचा गौरवस्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती व १९६५ च्या भारत-पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त नागपुरातील १९६५ च्या युद्घात सहभागी झालेल्या वीर सैनिकांचा गौरव महोत्सवात सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता केला जाईल. या सोहळ्याला नागपूरच्या माजी सैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इंडियन एक्स सर्व्हिसमॅन मुव्हमेंट नागपूर विभागाचे विलास दवणे व सुनील फुटाणे यांनी केले आहे. माजी सैनिकांची बैठकीची विशिष्ट व्यवस्था केली जाईल. यासाठीच्या पासेस भाजपच्या माजी सैनिक आघाडीचे नागपूर शहर अध्यक्ष राम कोकरे यांच्याकडे उपलब्ध आहेत. माजी सैनिकांनी आपली उपस्थिती नोंदविण्यासाठी विलास दवणे यांच्याशी संपर्क साधावा.
नागपूर महोत्सव आजपासून
By admin | Published: February 28, 2016 3:05 AM