लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत विविध विकास कामे सुरू आहेत. २०१९ ते २०३५ या काळात जगातील सर्वाधिक विकसित होणाऱ्या शहरामध्ये नागपूर पाचव्या क्रमांकावर असेल, असा निष्कर्ष ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स समूहाच्या वैश्विक आर्थिक संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. शहर विकासाचे श्रेय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाते, असेही या संशोधनात म्हटले आहे.ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स समूहाने २०१९ ते २०३५ या कालावधीत गतीने विकास होणाऱ्या शहरांची यादी जाहीर केली आहे. यात पहिल्या दहा शहरात नागपूर पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच गतीने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत पहिली दहा शहरे भारतातील आहेत. पहिल्या क्रमांकावर सूरत, त्यानंतर आग्रा, बेंगळुरू, हैदराबाद, नागपूर तिरुपूर, राजकोट, तिरुचिराप्पल्ली, चेन्नई आणि विजयवाडा आदी शहरांचा यात समावेश आहे. तसेच या अहवालानुसार २०१९ ते २०३५ गतीने विकास होणाऱ्या पहिल्या १० शहरात भारतातील १७ शहारांचा समावेश आहे.रस्ते विकासाला गती आली२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी निवडून आले. त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून सूत्रे स्वीकारताच विकास कामांचा धडाका लावला. पूर्वी रस्तेबांधणीचा वेग दिवसाला २ किलोमीटर होता. गडकरी यांनी या कामाला गती दिल्याने आता दररोज ३० किलोमीटरचे रस्ते निर्माण होत आहे. तसेच प्रकल्प खर्चाच्या १ टक्का निधी वृक्षलागवड व सौंदर्यीकरणावर केला जात आहे.बेंगळुरू डायनामिक शहरएका सर्वेक्षणानुसार बेंगळुरू हे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जगातील सर्वाधिक डायनामिक शहर म्हणून पुढे आले आहे. हे शहर इलेक्ट्रॉनिक शहर तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करीत आहे. बेंगळुरूनंतर हैदराबाद व दिल्ली शहराचा क्रमांक आहे. दिल्लीनंतर पुणे तर सातव्या क्रमांकावर चेन्नई आहे, असे अहवालात नमूद केले आहे.
गतिमान विकासात नागपूर पाचवे: ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स समूहाचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:08 PM
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत विविध विकास कामे सुरू आहेत. २०१९ ते २०३५ या काळात जगातील सर्वाधिक विकसित होणाऱ्या शहरामध्ये नागपूर पाचव्या क्रमांकावर असेल, असा निष्कर्ष ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स समूहाच्या वैश्विक आर्थिक संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. शहर विकासाचे श्रेय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाते, असेही या संशोधनात म्हटले आहे.
ठळक मुद्दे विकासाचे श्रेय नितीन गडकरींना