यदु जोशी ल्ल नागपूर सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांना नागपुरात फिल्मसिटी उभारायची आहे. त्यासाठी ते दोन दिवस नागपुरात तळ ठोकून आहेत. रविवारी त्यांनी विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे (वेद) प्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी याबाबत चर्चा केली. सोमवारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची शक्यता आहे.‘व्हिसलिंग वूडस्’ या मुंबईतील फिल्म इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा असलेले घई यांना नागपूरने आकर्षित केले आहे. वेदच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आमंत्रणावरून ते रविवारी सकाळी नागपुरात आले. ‘वेद’सोबत त्यांची बैठकही झाली. नागपूरला भौगोलिकफायदे अनेक आहेत. नागपूरच्या आसपास अप्रतिम निसर्गसौंदर्यदेखील आहे. त्या ठिकाणी सिनेमांचे शूटिंग होऊ शकते. फिल्मसिटी उभारण्यासाठी जागाही उपलब्ध होऊ शकते. मात्र अंगाची लाहीलाही करणारे ऊन येथे तीन महिने असते, ही बाब गुण कमी करणारी आहे. या सगळ्या बाबींचा विचार घई यांनी सुरू केला आहे. वेदच्या मदतीने फिल्मसिटीचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.व्हिसलिंग वूडस्चे बिझनेस हेड चैतन्य चिंचलीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, वेदने घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. फिल्मसिटी हा व्यापक विषय असून तो लगेच दृष्टिपथात येईल, असे नाही पण वेद आणि नागपुरातील राजकीय नेतृत्व त्यासाठी सहकार्य करेल, असा आमचा विश्वास आहे. घर्इंचा जन्म नागपूरचा ४सुभाष घई यांचा जन्म नागपूरचा आहे. त्यांचे मामा (मौकिल परिवार) इथे राहायचे. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत घई नागपुरातच राहायचे. त्यामुळे त्यांना नागपूरविषयी विशेष ओढ आहे. या मातीचे ऋण फेडण्याची भावना त्यांच्या मनात आहेत. त्यातूनच इथे फिल्मसिटी उभारण्याच्या विचारात ते आहेत.
नागपुरात फिल्मसिटी
By admin | Published: December 15, 2014 1:11 AM