शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

नागपुरात पुन्हा देह व्यापाराच्या अड्ड्यांवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 9:45 PM

डीसीपी चिन्मय पंडित यांच्या कारवाईनंतर खळबडून जागे  झालेल्या शहर पोलीसांनी २४ तासात एम्प्रेस मॉलसह दोन ठिकाणी सुरु असलेले देह व्यापाराचे अड्डे उघडकीस आणले.

ठळक मुद्देएम्प्रेस मॉलमध्ये स्पाच्या नावावर तर कळमन्यात घरी सुरु होता व्यापार

लोकमत न्यूज नेटवर्कटनागपूर : डीसीपी चिन्मय पंडित यांच्या कारवाईनंतर खळबडून जागे  झालेल्या शहर पोलीसांनी २४ तासात एम्प्रेस मॉलसह दोन ठिकाणी सुरु असलेले देह व्यापाराचे अड्डे उघडकीस आणले.पहिली कारवाई गांधीसागर तलाव येथील एम्प्रेस मॉलमध्ये करण्यात आली. सामाजिक सुरक्षा शाखेला मॉलमधील पहल्या माळ्यावर असलल्या ‘सलुन अ‍ॅण्ड स्पा’मध्ये देह व्यापार चालत असल्याची माहिती मिळाली. स्पाची मालक दर्शना उर्फ खुशी अनिल धकान (३५) रा. काचीमेट वाडी आहे. पोलिसांनी धाड टाकण्याची योजना आखली. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता डमी ग्राहक स्पामध्ये पाठवण्यात आला. खुशीने दीड हजार रुपयात एका तरुणीचा सौदा केला. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकून खुशीला पकडले. स्पा मध्ये तीन तरुणी सापडल्या. एक तरुणी दिल्लीची राहणारी आहे. पोलिसांनी स्पा मधून मोबाईल, रुपये आणि रजीस्ट्रर जप्त केले. अड्ड्यावर सापडलेल्या तरुणीचा विचारपूस केल्यावर पोलिसांनी खुशीला ताब्यात घेतले. खुशीला आॅक्टोबर २०१७ मध्ये सुद्धा वाडीमध्ये देह व्यापाराचा अड्डा चालवतांना पकडले होते. सुटल्यानंतर तिने अड्डा बंद केला होता. यानंतर एम्प्रेस मॉलमध्ये स्पा च्या नावावर देह व्यापार करू लागली. तिने ५० हजार रुपये महिना भाड्याने स्पा घेतला होता.सूत्रानुसार एम्प्रेस मॉलमध्ये अनेक दिवसांपासून देह व्यापार सुरु आहे. तीन महिन्यांपूर्वी बेलतरोडी पोलिसांनी केलेल्या कारवाईतही एम्प्रेस मॉलमध्ये देह व्यापार सुरु असल्याची बाब उघडकीस आली होती. सातत्याने चर्चा होवूनही पोलीस एम्प्रेस मॉलवर कारवाई करण्यास मागे पुढे पाहत होते.दुसरी कारवाई झोन पाचच्या विशेष चमूने कळमना येथे सुरु असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर केली. येथे एक महिला आणि आॅटोचालकास पकडले.पोलिसांना डिप्टी सिग्नल येथील कविता बांदे ही महिला देह व्यापार चालवित असल्याची माहिती मिळाली होती. या आधारावर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून कविताशी संपर्क साधला. त्याने दोन हजार रुपयात तरुणीचा सौदा केला. कविताने ग्राहकास आरोपी स्वीटी बागडे हिच्या घरी जाण्यास सांगितले. कविताने आॅटो चालक शेख कलीम शेख मुनीर (३२) रा. शेखनगर खरबी याच्यासोबत तरुणीला स्वीटीच्या घरी पाठवले.डमी ग्राहकाने इशारा करताच पोलीसांनी धाड टाकून स्वीटी आणि कलीमला पकडले. त्यांच्याकडे तरुणीही सापडली.कविता अनेक दिवसांपासून देह व्यापाराशी जुळलेली आहे. तिला यापूर्वीही पकडण्यात आले होते. ती नुकतीच जामिनावर सुटून आली आहे. त्यामुळे ती ग्राहकांना स्वत:च्या घरी बोलावण्याऐवजी स्विटीकडे पाठवते. आॅटोचालक तिच्या टोळीशी जुळलेला आहे. तो तरुणीला अड्ड्यावर पोहोचवण्याचे काम करतो. आरोपींच्या विरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ओमप्रकाश सोनटक्के, पीसीआय जितेंद्र ठाकूर, कर्मचारी राजकुमार जनबंधू, महेश बावणे, पंकज लांडे, विनोद सोनटक्के, सूरज भारती, प्रमोद वाघ, दिनेश बाने यादव, प्रभाकर मानकर, रवींद्र राऊत, मृदुल नागरे, दयाराम आणि सुजाता यांनी केली.

 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाnagpurनागपूर