लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उघड्यावर हागणदारीमुक्त (ओडीएफ) शहराची श्रेणी नागपूरला मिळालेली आहे. परंतु स्वच्छता सर्वेक्षण २०२० साठी ओडीएफ डबल प्लस रँकिंग निश्चित करण्यात आले होते. यात व्यक्तिगत शौचालय, सार्वजनिक शौचालय, सामुदायिक शौचालयांसह सिवरेज ट्रीटमेंटची व्यवस्था मजबूत असणे आवश्यक होते. केंद्रातून आलेल्या पथकाने मानकांची तपासणी केल्यानंतर शहराला ओडीएफ डबल प्लस रँकिंग प्रदान केले. यामुळे सर्वेक्षणात नागपूरला ५०० अंक मिळणे निश्चित आहे. तसेच वेगवेगळ्या मानकांचे सहा हजार गुण हे ठरविण्यात आलेले आहेत.मागच्या महिन्यात केंद्र सरकारचे एक पथक नागपूरला आले होते. त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांची पाहणी केली. यात त्यांना कुणीही उघड्यावर शौच करताना आढळून आले नाही. दुसरीकडे शहरात ७० सामुदायिक शौचालय, ६८ सार्वजनिक शौचालय पूर्णपणे सुरु असल्याचे आढळून आले.तसेच मनपाने १३,८०० व्यक्तिगत शौचालय बनवून दिलेले आहेत. याशिवाय शहरातून निघणाऱ्या दूषित पाण्यावर प्रक्रिया (ट्रीटमेंट) होत आहे. नागपुरात ३३० एमएलडी सीवेज पाण्यावर प्रक्रिया होत आहे. यापैकी १३० एमएलडी पाण्याचा पुनर्उपयोग महाजेनकोच्या प्लांटमध्ये वीज बनवण्यासाठी होत आहे. अशा परिस्थितीत नागपूर शहर व्यक्तिगत शौचालय, सामुदायिक शौचालय, सार्वजनिक शौचालय तसेच सीवेज ट्रीटमेंट प्लांट आदींमध्ये खरे उतरले आणि शहराला डबल प्लस रँकिंग मिळाले.विशेष म्हणजे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांना स्वच्छ आणि सुव्यवस्थित संचालित करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक शौचालयावर अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळेच चांगले परिणाम दिसून आले. स्वयंसेवी संस्थाही मदतीसाठी पुढे आल्या.ग्रीन व्हीजिल संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांनी संगितले की, आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वात गेल्या तीन महिन्यात स्वच्छता सर्वेक्षणाच्याबाबतीत चांगले काम होत आहे. ओडीएफ डबल प्लसची रँकिंग मिळाल्याने एकूण ५०० अंक मिळतील. ज्यामुळे सर्वेक्षणात नागपूरचे रँकिंग आणखी सुधारेल.जबाबदारी आणखी वाढली - आयुक्त बांगरमनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की, ओडीएफ डबल प्लस रँकिंग मिळाल्याने नागपूर महापलिकेची जबाबदारी आणखी वाढली आहे. संबंधित रँकिंग कायम ठेवण्यासाठी आणखी काम करावे लागेल. त्याच आधारावर सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था मजबूत करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वच्छता सर्वेक्षणाच्या मानकांवर मनपा काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.