शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
3
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
4
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
5
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
6
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
7
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
8
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
9
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
10
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
11
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
12
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
13
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
14
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
15
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
16
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
17
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
18
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
19
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
20
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

Nagpur: गर्लफ्रेण्डने दगाबाजी केली अन् तो आता हत्येच्या गुन्ह्यात आरोपी बनला, त्यांचे जमले, त्यांचे ठरले अन् ... :

By नरेश डोंगरे | Published: June 10, 2023 10:12 PM

Nagpur: तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर ‘तिचे-त्याचे सूत जमले’ अन् त्यांची प्रेमकथा सुुरू झाली. मात्र, काही दिवसांनंतर तिने दगाबाजी केली. दुसरा निवडला अन् लग्नही केले. त्यामुळे तो कावराबावरा झाला. मजनूसारखा वागू लागला अन् आता हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोपी बनला.

- नरेश डोंगरे

नागपूर : तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर ‘तिचे-त्याचे सूत जमले’ अन् त्यांची प्रेमकथा सुुरू झाली. मात्र, काही दिवसांनंतर तिने दगाबाजी केली. दुसरा निवडला अन् लग्नही केले. त्यामुळे तो कावराबावरा झाला. मजनूसारखा वागू लागला अन् आता हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोपी बनला. किरकोळ कारणावरून शुक्रवारी पहाटे रेल्वेस्थानकावर हत्या करणाऱ्या आरोपीच्या चाैकशीतून एक भलतीच प्रेमकथा पुढे आली आहे.

दिनेश धोंडिबा सदाफुले (वय ३२) पुण्यातील वारजे माळवाडी, रामनगर येथील रहिवासी आहे. घरची स्थिती ठिकठाक असणारा दिनेश सध्या रेल्वे पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याने सोबत राहणाऱ्याने आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या दिल्याने जितेंद्र उर्फ टोपी (रा. बलोद, छत्तीसगड) याची सिमेंटच्या फळीने ठेचून हत्या केली. रेल्वेच्या पोलिस निरीक्षक मनीषा काशिद यांनी त्याला न्यायालयात हजर करून त्याची १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळवली. दरम्यान, पुण्यासारख्या शहरात घर, आईवडील आणि अन्य कुटुंबीय असताना दिनेश इकडे कशाला आला, अनाथासारखा का राहत होता, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता दिनेशची प्रेमकथा पुढे आली.

दिनेशची घरची स्थिती ठिकठाक होती. तो मिळेल ते काम करून छानछोकीने राहत होता. एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले अन् त्यांची प्रेमकथा बहरली. त्या दोघांनी ‘जिना मरना तेरे संग’ असे 'कसमे-वादे'ही केले. तिच्या प्रेमात दिनेश पुरता गुंतला असताना अचानक तिने दगाबाजी केली. दुसरा निवडला अन् त्याच्याशी लग्नही केले. प्रेयसीच्या या पवित्र्यामुळे दिनेश सैरभैर झाला. तिच्या विरहात चार वर्षांपासून वेड्यासारखा वागू लागला. घर सोडून बेवारस सारखा कुठेही फिरू लागला. पोट भरण्यासाठी कोणतेही काम करायचे अन् कुठेही झोपायचे, असे त्याचे सुरू झाले. याच अवस्थेत तो चार महिन्यांपूर्वी भटकत भटकत नागपुरात आला. कॉटन मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना रात्रंदिवस काम अन् पोटभरेल एवढी मजुरीही मिळते. त्यामुळे छोटे मोठे काम करून पोट भरायचे आणि बाजुच्या रेल्वेस्थानकावर कोणत्याही फलाटावर झोपायचे, असा त्याचा दिनक्रम बनला. त्याचा ना कुणी दोस्त होता ना कुणी दुष्मन. मात्र, गुरुवारी रात्री दारूच्या नशेत कुठल्याशा किरकोळ कारणावरून त्याच्याच सारखा बेवारस जीवन जगणाऱ्या जितेंद्रसोबत वाद झाला. अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या अन् त्यामुळे रागाच्या भरात त्याने बाजुला पडून असलेल्या सिमेंटच्या फळीने दगडाने ठेचून झोपेत असलेल्या जितेंद्रची हत्या केली अन् आता पोलीस कोठडीत पोहचला.

तो आता भलत्याच 'मोड'वरप्रेमभंग झाल्यानंतर माणूस कसा दिशाहिन होऊन वागतो अन् नंतर त्याचे काय होते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा या प्रकरणातून आला आहे. हातून एवढा गंभीर गुन्हा घडल्याने तो आता भलत्याच 'मोड'वर गेला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर