लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचा आनंद खरेच अविस्मरणीय आहे. पहिल्यांदा मेट्रोत प्रवास करीत असल्यामुळे हा आनंदाचा क्षण कधीच विसरणार नाही. महामेट्रोने महिलांसाठी एक कोच राखीव ठेवल्यामुळे त्यांचे अभिनंदन आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून नागपूरकरांना प्रदूषणमुक्त प्रवासाचे एक नवे साधन मिळाले आहे. मेट्रो रेल्वेचा विस्तार दूरवर व्हावा, असे मत प्रवाशांनी जॉय राईडदरम्यान लोकमतशी बोलताना व्यक्त केले.दिव्यांग व दृष्टिहीनांनी घेतला आनंदमहामेट्रोच्या खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३.५ कि़मी. अंतरावरील नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन व्हिडिओ लिंकद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नागपूरकरांप्रति कृतज्ञता म्हणून महामेट्रोने ८ मार्च आभार दिवस साजरा केला. या अंतर्गत नागपूरकरांसाठी मोफत राईडचे आयोजन सीताबर्डी ते खापरीपर्यंत करण्यात आले. महिलांनी मोठ्या प्रमाणात राईडचा आनंद घेत जागतिक महिला दिन साजरा केला. महिलांसोबत दिव्यांग, दृष्टिहीन, शाळा व कॉलेजचे विद्यार्थी, वयस्क, युवक-युवतींनी जॉय राईडचा आनंद लुटला.तीन राईडचे आयोजनमहामेट्रोने शुक्रवार सकाळपासून सीताबर्डी ते खापरी आणि खापरी ते सीताबर्डी अशा तीन राईडचे आयोजन केले. सकाळी ११ वाजता पहिली, ३.३० वाजता दुसरी आणि सायंकाळी ५.३० वाजता खास महिलांसाठी तिसरी राईड घेण्यात आली. एका राईडमध्ये ९७० प्रवाशांप्रमाणे तीन राईडच्या माध्यमातून जवळपास ३ हजार लोकांनी शुक्रवारी मेट्रो रेल्वेतून प्रवास केला. शनिवार, ९ मार्चपासून एक महिना सवलतीच्या दरात लोकांना प्रवास करता येणार आहे.एक जॉय राईड केवळ महिलांसाठीजागतिक महिला दिनानिमित्त मेट्रो रेल्वेतर्फे सायंकाळी ५.३० वाजता विशेष जॉय राईडचे आयोजन सीताबर्डी स्टेशनवर करण्यात आले. उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी महापौरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सायंकाळच्या राईडमध्ये जवळपास हजारापेक्षा जास्त महिलांनी प्रवास केला. महापौर म्हणाल्या, मेट्रो रेल्वेमुळे नागपूरकरांना वाहतुकीच्या कोंडीपासून सुटकारा मिळणार आहे. यामुळे नागपूरची वाहतूक व्यवस्था सुलभ होणार आहे. महामेट्रो पहिल्या टप्प्याचे काम कमी वेळेत पूर्ण करून रेकॉर्ड केला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास आहे. यावेळी महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.
नागपूरकरांना वाहतुकीचे नवे साधन मिळाले : मेट्रो रेल्वेच्या जॉय राईडमध्ये महिलांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 9:10 PM
मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचा आनंद खरेच अविस्मरणीय आहे. पहिल्यांदा मेट्रोत प्रवास करीत असल्यामुळे हा आनंदाचा क्षण कधीच विसरणार नाही. महामेट्रोने महिलांसाठी एक कोच राखीव ठेवल्यामुळे त्यांचे अभिनंदन आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून नागपूरकरांना प्रदूषणमुक्त प्रवासाचे एक नवे साधन मिळाले आहे. मेट्रो रेल्वेचा विस्तार दूरवर व्हावा, असे मत प्रवाशांनी जॉय राईडदरम्यान लोकमतशी बोलताना व्यक्त केले. दिव्यांग व दृष्टिहीनांनी घेतला आनंद
ठळक मुद्दे महामेट्रोतर्फे आभार दिवस