ठळक मुद्देदोन लाखांहून अधिक मतदार ३२० पोलिंग बूथवर होणार मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यायालयाच्या निर्देशानंतर नागपूर पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने बनविण्यात आल्या आहेत. नव्याने करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल २८ टक्के मतदार घटले आहेत. मतदारसंख्या कमी झाल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. या घटलेल्या आकड्याचा फटका बसेल की फायदा होईल याचे अंदाजदेखील मांडले जात आहेत.
मागील निवडणुकीच्या वेळी २ लाख ८८ हजार २२३ मतदार होते. यंदा त्यात ८१ हजार ७६९ मतदारांची घट झाली आहे. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत २ लाख ६ हजार ४५४ मतदार मतदान करणार आहे. त्यासाठी ३२० मतदान केंद्र तयार करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.