शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
3
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
4
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
6
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
8
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
9
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
10
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
11
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
12
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
13
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
14
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
16
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
18
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
19
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
20
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 8:04 PM

कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावी व परिणामकारक उपचारामुळे भारतात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित ४०९ नागरिकांपैकी २९९ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. कोरोनामधून सरासरी ७४ टक्के रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावी व परिणामकारक उपचारामुळे भारतात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित ४०९ नागरिकांपैकी २९९ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. कोरोनामधून सरासरी ७४ टक्के रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.रुग्ण उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण भारतात ४०.४ टक्के तर राज्यात २६.३ टक्के एवढे असून त्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात तसेच देशातही सर्वाधिक आहे. कोरोनाबाधितांच्या तपासणीसह उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे स्वतंत्र कोविड वॉर्ड तयार करण्यात आला. त्यासोबतच उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू चोवीस तास उपलब्ध आहे.कोरोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी शहरात पाच अत्याधुनिक प्रयोगशाळा असून यामध्ये शहरातील ९ हजार ८१८ स्वॅबच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधितांमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये जगात सर्वाधिक जर्मनी येथील रुग्ण बरे होण्याचे ८७.९ टक्के, इटली ५३.३, फ्रान्स ३४.९, अमेरिका २३.३, रशिया २७.७ इतके आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४०.४ टक्के तर महाराष्ट्रात २६.३ टक्के एवढी आहे. त्या तुलनेत नागपूर शहरात पूर्ण बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर