ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशानुसार मनपाची कारवाई : चिखली येथे विरोध
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते़ त्यानुसार महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली असून गेल्या चार दिवसांत ५१ अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे़शहरातील धार्मिक अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका आणि नासुप्र यांनी अॅक्शन प्लॅन आठवडाभरात सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने शुक्रवारपासून कारवाई सुरू केली़ शहरात २००९ पूवीर्ची १ हजार ५२१ व २००९ नंतरची ५५ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत़ गेल्या चार दिवसांत ५१ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली़सोमवारी हनुमाननगर झोन, नेहरूनगर झोन आणि धरमपेठ झोनअंतर्गत कारवाईत एकूण १५ अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले़ धरमपेठ झोन अंतर्गत तेलंखेडी, गोंडपुरा, अभ्यंकरनगर, अमरावती रोड येथील तीन धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले़ हनुमाननगर झोनच्या पथकाने आयआरडीपी रोड मेडिकल चौक, तुकडोजी पुतळा, कॅन्सर हॉस्पिटलच्या बाजूचे मंदिर, छोटा ताजबाग, रघुजीनगर, एनआयटी कॉम्प्लेक्स, आदिवासीनगर, उदयनगर, हुडकेश्वर, मानेवाडा चौकातील सहा धार्मिकस्थळांचे अतिक्रमण काढले़ नेहरूनगर झोन येथील वृंदावननगर, सद्भावनानगर, जे. पी. कॉन्व्हेंट, अग्रेसिव्ह-ले-आऊट, रमणा मारोती, गणेशनगर, नंदनवन येथील एकूण सहा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले़ सहाय्यक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली़नासुप्रनेही केली कारवाईनासुप्र सभापती तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात सोमवारी धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई करण्यात आली. मिनीमातानगर येथून सुरुवात करण्यात आली ज्यामध्ये दुर्गा माता मंदिर , गणेश मंदिर, कालीमाता मंदिर ,हनुमान मंदिर व शिवमंदिर, शंकरमंदिर आणि हनुमानमंदिर अशा सहा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण ४ टिप्पर आणि ३ जेसीबीच्या साहाय्याने दुपारी २.३० वाजेपर्यंत काढण्यात आली.५१चिखली येथे विरोधमौजा चिखली (देव), मिनीमातानगर भूखंड क्र. ६३१ (आराजी ५००० चौ. फूट) वरील धार्मिक अतिक्रमण काढण्यात आले़ स्थानिक नागरिकांनी मंदिराचे बांधकाम तोडण्यास तीव्र विरोध केला़ परंतु, नासुप्र अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सामंजस्याने प्रकरण सांभाळून नागरिकांची समजूत काढत अनाधिकृत धार्मिक स्थळावरील अतिक्रमण काढण्यात आले. ही कारवाई पूर्व विभागातील कार्यकारी अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी (पूर्व) भरत मुंडले आदींच्या नेतृत्वात करण्यात आली़