लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी या न्यायालयाची इमारत गळत असल्याची मौखिक माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने हायकोर्ट बार असोसिएशनला यावर एक आठवड्यात अर्ज दाखल करण्यास सांगितले.असोसिएशनने उच्च न्यायालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून मिळाव्या व वकिलांच्या विविध समस्या सोडविता याव्या याकरिता जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, इमारत गळत असल्याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली. तसेच, यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. इमारत गळत असल्यामुळे वकिलांना अडचण सहन करावी लागत आहे. तसेच, महत्त्वाची कागदपत्रे खराब होत आहेत याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. असोसिएशनतर्फे अॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.
नागपूर हायकोर्ट इमारतीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:35 AM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी या न्यायालयाची इमारत गळत असल्याची मौखिक माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने हायकोर्ट बार असोसिएशनला यावर एक आठवड्यात अर्ज दाखल करण्यास सांगितले.
ठळक मुद्देकागदपत्रे खराब होताहेतवकिलांना अडचण