लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवामानात आलेल्या बदलामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील पारा खाली घसरला असला तरी शुक्रवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक उष्ण राहिले. शहरात कमाल तापमान ४२.५ डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आले. नागपुरात मागील २४ तासात कमाल तापमान २ डिग्रीने वाढले आहे. बुलडाण्यामध्ये २२ मिमी, अमरावतीत ५.२ मिमी पाऊस झाल्याने येथील कमाल तापमान अनुक्रमे ३६.२ व ३६.८ डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. सर्वाधिक उष्ण असलेल्या अकोल्यातील तापमानही ३७.१ डिग्री सेल्सियस राहिले. मे महिन्यातील मध्यात नागपूरसह विदर्भात भीषण उष्णता राहते. परंतु यावेळी हवामानाचे वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. हवामान विभागानुसार वर्धा येथे ४१.८ डिग्री, ब्रह्मपुरी ४१.४, गडचिरोली-गोंदिया ४१ आणि वाशिम येथे ३९ डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे.
विदर्भात नागपूर सर्वात उष्ण; पारा ४२.५ डिग्रीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:08 AM
हवामानात आलेल्या बदलामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील पारा खाली घसरला असला तरी शुक्रवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक उष्ण राहिले.
ठळक मुद्देनागपुरात मागील २४ तासात कमाल तापमान २ डिग्रीने वाढले