लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लक्ष्मीनगर झोन हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील भाग आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. आवश्यक कामासाठी निधीची कमतरता नाही. असे असूनही झोन मधील काही वस्त्यात रस्ते, गडर लाईन, कचऱ्याची समस्या आहेत. मंगळवारी ही बाब महापौर नंदा जिचकार यांच्या निदर्शनास आली. महापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिचकार यांनी लक्ष्मीनगर मधील प्रभाग १६ व ३८ चा दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.झोनमधील प्रभाग १६ व ३८ अंतर्गत तकिया, इंडियन जिमखाना मैदान, काँग्रेस नगर उद्यान जवळील परिसर, खामला येथील संचयनी कॉम्प्लेक्स, हिंगणा मार्गावरील टाकळी सिम, यशोदा नगर, आनंद नगर आदी ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेवक लखन येरवार, किशोर वानखेडे, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.तकिया येथील इंडियन जिमखानाच्या मैदानात मुख्य मार्गालगत निर्माणधीन इमारतीच्या अर्धवट बांधकामामुळे इमारतीच्या खालच्या भागात घाण पाणी साचले आहे. तसेच येथे कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे, डासांच्या प्रकोपाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खामला येथील संचयनी कॉम्प्लेक्स संदर्भातही अशीच परिस्थिती असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यासंदर्भात कारवाईचे निर्देश देण्यात आले. काँग्रेसनगर उद्यानाजवळ मोकळ्या भूखंडावर कचरा व इतर घाण असल्याने त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. टाकळी सिम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमधील जागेतून रस्ता तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावर कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. आनंद नगर परिसरातील विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. या विहिरीची सफाई करून येथे तातडीने जाळी लावण्यात यावी. यशोदानगर भाग एक येथील नाल्याच्या समस्येबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ११ फेब्रुवारीला होणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रारंभी महापौरांनी लक्ष्मीनगर झोन कार्यालयातील विविध विभागांचा आढावा घेतला. नागरिकांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने जबाबदारीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नागपुरात रस्ते, गडरलाईन व कचऱ्याच्या समस्येतून मुक्ती कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 9:32 PM
लक्ष्मीनगर झोन हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील भाग आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. आवश्यक कामासाठी निधीची कमतरता नाही. असे असूनही झोन मधील काही वस्त्यात रस्ते, गडर लाईन, कचऱ्याची समस्या आहेत. मंगळवारी ही बाब महापौर नंदा जिचकार यांच्या निदर्शनास आली. महापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिचकार यांनी लक्ष्मीनगर मधील प्रभाग १६ व ३८ चा दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
ठळक मुद्देमहापौर लक्ष्मीनगर झोनच्या दारी : अर्धवट बांधकामामुळे डासांचा त्रास