- मोरेश्वर मानापुरे नागपूर - लोकसभा-२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान धनशक्तीचा बेकायदेशीर वापर करण्याच्या धोक्याला आळा घालण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयकर विभागाला आदेश दिले आहेत. आदेशानुसार आयकर विभागाचे पुणे येथील महासंचालनालय (अन्वेषण) कार्यालय गोपनीय माहिती गोळा करीत आहे. तसेच रोख आणि मौल्यवान वस्तूंच्या हालाचालींवर कडक नजर ठेवत आहे.
महाराष्ट्रात धनशक्तीचा गैरवापर रोखण्यासाठी आयकर कायद्यांतर्गत बृहन्मुंबई आणि नवीन मुंबईच्या अखत्यारीतील क्षेत्र वगळून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. या कार्यालयाने निवडणूक प्रक्रियेत रोख, मौल्यवान वस्तूंचा बेकायदेशीर वापरासंदर्भात सर्वसामान्यांकडून माहिती/तक्रार प्राप्त करण्यासाठी टोल फ्री क्रमांक पुणे (१८००२३३०३५३), नागपूर (१८००२३३०३५५) आणि पुणे (९४२०२४४९८४), नागपूर (९४०३३९०९८०) असे व्हॉट्सअप क्रमांक ई-मेलसह पुणे येथे आयकर सदर, आठवा मजला, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी आणि नागपूर येथे आयकर भवन, पहिला मजला, आरटीटीसी बिल्डिंग, बालाजी मंदिरजवळ, सेमिनरी हिल्स येथे २४ बाय ७ कार्यरत असणारे दोन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. या टोल फ्री आणि व्हॉट्सअप क्रमांकावर रोख रक्कम, सोने-चांदीचा बेकायदेशीर साठा, हालचाल आणि वितरण यासंबंधी माहिती जनतेने द्यावी, असे आवाहन आयकर विभागाच्या महासंचालनालय (अन्वेषण) कार्यालयाने केले आहे.