लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या चार वर्षात नागपुरात ७५ आर्थिक गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यामध्ये ५७ हजार ९०४ गुंतवणूकदारांची एकूण ३६८ कोटी ३८ लाख ८९ हजार ९८९ रुपयांनी फसवणूक झाली आहे. यापैकी केवळ १४७ कोटी ४५ लाख ५० हजार ९३४ रुपयेच गुन्हेगारांकडून वसूल झाले आहेत.गुन्हे शाखेच्या आर्थिक कक्षाने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून ही धक्कादायक बाब प्रकाशात आली आहे. ही माहिती १ जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीतील आहे. इतर माहितीनुसार, ७५ पैकी १२ आर्थिक गुन्हे बँकांशी संबंधित आहेत. तक्रारीनंतर पोलिसांनी अरविंद सहकारी बँक, एलिना एम्प्लॉयमेंट रिसोर्स फार्म, वासनकार इन्व्हेंस्टमेन्ट, शिक्षक सहकारी बँक, शेयर्स मार्के ट, शिष्यवृत्ती, व्ही. व्ही. इन्व्हेस्टमेन्ट, व्हिनस एफ. एक्स. कंपनी, बिट क्वाईन, साई प्रकाश डेव्हलपमेन्ट, क्यू नेट विहान, ढोकेश्वर क्रेडिट सोसायटी, गांडुळ खत प्रकल्प, समृद्धी जीवन सोसायटी आदींशी संबंधित १३८ आरोपींना अटक केली. सध्या ३३ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. महिला व समता सहकारी बँक घोटाळ्यात किती रक्कम वसूल करण्यात आली व किती आरोपींना अटक करण्यात आली याची माहिती अनुपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
नागपुरात गुंतवणूकदारांची चार वर्षात ३६८ कोटी रुपयांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:07 AM
गेल्या चार वर्षात नागपुरात ७५ आर्थिक गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यामध्ये ५७ हजार ९०४ गुंतवणूकदारांची एकूण ३६८ कोटी ३८ लाख ८९ हजार ९८९ रुपयांनी फसवणूक झाली आहे. यापैकी केवळ १४७ कोटी ४५ लाख ५० हजार ९३४ रुपयेच गुन्हेगारांकडून वसूल झाले आहेत.
ठळक मुद्दे७५ गुन्ह्यांची नोंद : १३८ आरोपींना अटक, ३३ गुन्हे न्यायप्रविष्ट