नागपूर : ‘हम दिल दे चुके सनम’ मधील ‘तडफ तडफ के इस दिल से आह निकलती रही...’ असो माचिस चित्रपटातले ‘छोड आए हम वो गलिया...’ हे गीत असो वा ‘दिल चाहता है’ मधले ‘कोई कहे कहता रहे...’ या त्यांच्या गीतांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचा ‘पल’ हा अल्बमही गाजला आहे. या अल्बमला स्टार स्क्रीन अवार्डने गौरविण्यात आले. हिंदी,. तेलगू, मल्याळम, तामिळ, कन्नड आदी भाषांतील त्यांनी गायलेली गीते अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले असून यात ‘रहना है तेरे दिल मे.., अक्स, लज्जा, दीवानापन, तेरे लिये, हेराफेरी, प्यार मे कभी कभी, ढाई अक्षर प्रेम के’ आदी अनेक चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग सूर ज्योत्स्ना अवॉर्डच्या निमित्ताने नागरिकांना मिळणार आहे. यापूर्वी त्यांचा कार्यक्रम नागपुरात १२ वर्षापूर्वी यशवंत स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला होता.मोठ्या अंतराने के. के. नागपुरात कार्यक्रम सादर करणार असल्याने नागपूरकरांमध्येही प्रचंड कुतूहलाचे वातावरण आहे.
नागपूरकरांना के. के.चे कुतूहल
By admin | Published: March 21, 2016 2:54 AM