शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

Nagpur Lok Sabha Results 2024 : गडकरींची नागपुरातून हॅटट्रीक,१.३७ लाखांचे मताधिक्य

By योगेश पांडे | Published: June 04, 2024 8:23 PM

Nagpur Lok Sabha Results 2024 : एकूण मतदानाच्या ५४.०५ टक्के मत गडकरी यांच्याच पारड्यात

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क Nagpur Lok Sabha Results 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपला दबदबा कायम राखत विजय मिळविला आहे. त्यांची ही हॅटट्रीक ठरली आहे. एकूण मतदानाच्या ५४.०५ टक्के मत गडकरी यांच्याच पारड्यात आली आहेत. मागील वेळच्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य १.५६ टक्क्यांनी घटले आहे.

मंगळवारी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच गडकरींनी आघाडी घेतली होती व अखेरच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिली. प्रत्येक फेरीनंतर त्यांचे मताधिक्य वाढतच गेले. नागपुरच्या रिंगणात एकूण २६ उमेदवार उभे होते व १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते. नागपुरात एकूण १२ लाख ७ हजार ४५५ इतके मतदान झाले. नितीन गडकरी यांना एकूण ६ लाख ५५ हजार २७ मतं पडली होती तर कॉंग्रेसचे विकास ठाकरे यांना ५ लाख १५ हजार ९४१ मते मिळाली. गडकरी यांचा एकूण ५ लाख ३७ हजार ६०३ इतक्या मतांनी विजय झाला.

‘एक्झिट पोल्स’चे अंदाज खरे ठरलेनागपूर लोकसभा मतदारसंघात युतीचेच उमेदवार विजयी होतील, असा अंदाज ‘एक्झिट पोल्स’मधून वर्तविण्यात आला होता. निकालानंतर हा अंदाज खरा ठरल्याचे दिसून आले.

नागपुरात गडकरींच्या विकासाची जादू चालली

एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मिळालेल्या दणदणीत विजयामुळे त्यांचे केंद्रातील वजन आणखी वाढले आहे. या विजयामुळे गडकरी यांनी एक नवा इतिहास रचला आहे. गडकरी यांच्या विजयाचे संपूर्ण श्रेय त्यांच्या विकासकारणाला जात असून नागपुरात झालेल्या विकासकामांची पावती मतदारांनी मतांच्या रुपात त्यांना दिलेली आहे.

नागपुरला विकसित शहर बनविणारमतदारांचे प्रेम व त्यांचा विश्वास यामुळेच हा विजय मिळाला आहे. नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहील. देशातील विकसित शहरांच्या यादीत नागपूरला स्थान मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. कार्यकर्त्यांचे प्रेम व आपला विश्वास हीच माझी मोठी ताकद आहे, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरNitin Gadkariनितीन गडकरी