लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आॅरेंजसिटी’ अशी ख्याती असलेल्या नागपूर शहरात येत्या ११ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन होत आहे. नागपूर महामॅरेथॉनच्या नाव नोंदणीला शुक्रवारी शानदार सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी एक हजार धावपटूंनी नोंदणी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.लोकमत समूहातर्फे ऐतिहासिक शहर औरंगाबाद तसेच नाशिक येथील प्रचंड यशानंतर नागपुरातील धावपटूंमध्ये नाव नोंदणीसाठी चढाओढ सुरू आहे. विविध सामाजिक ग्रुप आणि कॉर्पोरेट ग्रुप तसेच आरोग्याप्रति जागरुक असलेले नागरिक महामॅरेथॉनमध्ये धावण्यास सज्ज झाले आहेत.नाशिकपासून यावर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’चा श्रीगणेशा झाला आहे. नाशिक येथील उदंड प्रतिसादानंतर औरंगाबाद येथे १७ डिसेंबर रोजी महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. आता ११ फेब्रुवारीला नागपुरात महामॅरेथॉन आटोपल्यानंतर चौथा आणि अखेरचा टप्पा कोल्हापूर असेल. कोल्हापुरात १८ फेब्रुवारीला आयोजन होणार आहे.सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात ‘लोकमत’ने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. समाजात आरोग्य, फिटनेसविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि एकोपा वाढावा या उदात्त हेतूने ‘लोकमत’ समूहातर्फे महामॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे. नाशिक तसेच औरंगाबादेत झालेल्या महामॅरेथॉनला क्रीडारसिक, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक व महिलांसह देश-विदेशातील धावपटूंचा उदंड प्रतिसाद लाभला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेल अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेली ही अत्युच्च दर्जाची ‘लोकमत’ समूहाची मॅरेथॉन असल्याची धावपटूंची प्रतिक्रिया होती. भोजवानी फुडस् हे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर हे आहेत. आयोजनात मेघे ग्रुपचे नेल्सन मदर अॅण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटलचे सहकार्य लाभले आहे. प्राईड पार्टनर जी.एच. रायसोनी युनिव्हर्सिटी आणि हेल्थ केअर पार्टनर विदर्भ इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस(विम्स) हे आहेत.
नागपूर महामॅरेथॉन; पहिल्याच दिवशी हजार धावपटूंची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:06 AM
‘आॅरेंजसिटी’ अशी ख्याती असलेल्या नागपूर शहरात येत्या ११ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन होत आहे. नागपूर महामॅरेथॉनच्या नाव नोंदणीला शुक्रवारी शानदार सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी एक हजार धावपटूंनी नोंदणी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ठळक मुद्देया महामॅरेथॉनच्या नोंदणीत जास्तीत जास्त धावपटू, नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२२०००६३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. लोकमत समूहातर्फे आयोजित नागपूर व कोल्हापूर महामॅरेथॉनसाठी नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुकांना या दोन्ही महामॅरेथॉनची नोेंदणी नागपूर येथील लोकमत भवन, लोकमत चौक, वर्धा रोड येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येईल.या महामॅरेथॉनमध्ये नोंदणी आॅनलाईनही करता येईल. यासाठी धावपटूंनी पुढील वेबसाईटवर जावे. www.mahamarathon.com