लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोअर या रिच-४ च्या ८.३० कि.मी.चे कार्य वेगात सुरू असून रुळ टाकण्यात येत आहेत. व्हायाडक्टचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील प्रकल्पाचे काम सुरू असताना त्या भागातून प्रवास करणाऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून उभारण्यात आलेले बॅरिकेड हटविण्यात आले आहेत. अनेक भागातील प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.या मार्गावर एकूण ९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. कॉटन मार्केट, नागपूर रेल्वे स्टेशन, दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलिफोन एक्स्चेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक, प्रजापती नगर अशी नावे आहेत. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे. मेट्रोच्या या मार्गालगत गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरिता महत्त्वाची असून, मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होते. नागपूर शहराचा विस्तार होत असताना या मार्गावरील वाहतूक सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबविताना मेट्रोने पुरेपूर काळजी घेण्यात आली.रिच-४ चे झालेले कार्यपाईल्स १२८४ पैकी १२८४, पाईल कॅप २५० पैकी २५०, पिल्लर २७६ पैकी २३२, पिल्लर कॅप २४२ पैकी २०७, पिल्लर आर्म ४५ पैकी ४५, ट्रॅक आर्म ४४ पैकी ३२, सेग्मेंट उभारणी २४९१ पैकी २१२०, सेग्मेंट कास्टिंग २४९१ पैकी २३८७ झाले आहे. गर्डर लॉन्चिंगचे कार्य प्रगतिपथावर आहे.
नागपूर महामेट्रो : रिच-४ वर व्हायाडक्टचे ७९ टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 8:36 PM
महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोअर या रिच-४ च्या ८.३० कि.मी.चे कार्य वेगात सुरू असून रुळ टाकण्यात येत आहेत. व्हायाडक्टचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे.
ठळक मुद्दे ८.३० कि़मी.वर रुळ टाकायला सुरुवात