लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सुमारे दोन महिन्यानंतर महापौर आरक्षणाची सोडत काढण्याची शक्यता आहे. यानंतरच कुठल्या प्रवर्गाचा महापौर असेल हे निश्चित होईल. मात्र अशा स्थितीत विद्यमान महापौर नंदा जिचकार यांना कार्यकाळ वाढवून हवा आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाला पत्र लिहून मागणी केली आहे. त्यांच्या जवळ अनेक योजना व काम असून त्यांची पूर्तता करण्यासाठी वेळ कमी असल्याचा युक्तिवाद त्यांनी यात केला आहे.महापौरांनी सुमारे दीड महिन्याअगोदरच कार्यकाळ वाढविण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र आता ही बाब समोर आल्यानंतर सत्तापक्षातील नगरसेवक व नेत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. कार्यकाळ वाढवायचा की नाही याबाबत राज्य शासनाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.महापौर बदलण्याचा बनला दबावसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपा निवडणुकानंतर महापौरांची निवड होणार होती, तेव्हाच सव्वा वर्षात महापौरपदी नवीन सदस्याची नियुक्ती करावी, असे भाजपाने ठरविले होते. नंदा जिचकार यांचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा झाल्यानंतरच त्यांना बदलण्यात येईल, अशा चर्चांना पेव फुटले होते. भाजपाच्या विविध गटांमधील नेते त्यांना बदलण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नंदा जिचकार यांना हटविण्यात त्यांना यश आले नाही. पुढील दोन महिन्यात त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. मात्र त्यांनी आता सहा महिन्यांची मुदत वाढवून मागितल्याने चर्चांना नव्याने सुरुवात झाली आहे.ही पक्षाची अंतर्गत बाब : महापौरयासंदर्भात नंदा जिचकार यांना विचारणा केली असता त्यांनी असे पत्र लिहिले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नागपुरात महापौर परिषदेचे आयोजन होणार आहे. भाजपाचे प्रवक्ता व आ. गिरीश व्यास यांच्या माध्यमातून कार्यकाळ वाढविण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यात काहीच गैर नाही. पत्राला राजकीय वळण देणे अयोग्य आहे. ही पक्षाची अंतर्गत बाब आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.शहराध्यक्षांना काहीच माहीत नाहीआश्चर्याची बाब म्हणजे माजी महापौर व भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. महापौरांचा कार्यकाळ वाढविण्यासंदर्भातील पत्र कुणी कुणाला लिहिले याची काहीच माहिती नाही. त्यामुळे मी यावर बोलणे योग्य होणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.
नागपूर महापौरांना हवे ‘एक्स्टेंशन’ : राज्य शासनाला लिहिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:23 AM
सुमारे दोन महिन्यानंतर महापौर आरक्षणाची सोडत काढण्याची शक्यता आहे. यानंतरच कुठल्या प्रवर्गाचा महापौर असेल हे निश्चित होईल. मात्र अशा स्थितीत विद्यमान महापौर नंदा जिचकार यांना कार्यकाळ वाढवून हवा आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाला पत्र लिहून मागणी केली आहे. त्यांच्या जवळ अनेक योजना व काम असून त्यांची पूर्तता करण्यासाठी वेळ कमी असल्याचा युक्तिवाद त्यांनी यात केला आहे.
ठळक मुद्देकाम करण्यासाठी वेळ कमी असल्याचा केला दावा