शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

नागपुरात  एमडी तस्कर मोहित साहूसह दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:44 PM

सर्वात महागडा अमली पदार्थ म्हणून ओळखला जाणाऱ्या एमडी पावडरची तस्करी करणारा मोहित राजकुमार साहू (वय २४, रा. कोलबा स्वामीनगर) आणि आमिर मलिक मुकीम मलिक (वय २८, रा. हमिदनगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७९ ग्राम एमडी पावडर आणि महागड्या मोबाईलसह ४ लाख, ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास दयानंद पार्कजवळ पाचपावली पोलिसांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.

ठळक मुद्देपावडरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त : पाचपावली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपर : सर्वात महागडा अमली पदार्थ म्हणून ओळखला जाणाऱ्या एमडी पावडरची तस्करी करणारा मोहित राजकुमार साहू (वय २४, रा. कोलबा स्वामीनगर) आणि आमिर मलिक मुकीम मलिक (वय २८, रा. हमिदनगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७९ ग्राम एमडी पावडर आणि महागड्या मोबाईलसह ४ लाख, ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास दयानंद पार्कजवळ पाचपावली पोलिसांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.मोहित गेल्या अनेक वर्षांपासून अमली पदार्थाच्यातस्करीत गुंतला आहे. त्याला जुलै २०१७ मध्येही कोकेनसह अटक करण्यात आली होती. दरम्यान, मोहित आणि त्याचा एक साथीदार आज पहाटे एमडीची मोठी खेप घेऊन येणार असल्याची माहिती पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. ही माहिती पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांना कळविल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. पहाटे ३.३० च्या सुमारास आरोपी मोहित साहू अ‍ॅक्टिव्हाने दयानंद पार्कजवळून जाताना दिसला. पोलिसांनी त्याला रोखत तपासणी केली असता त्याच्याकडे तब्बल ७९ ग्राम एमडी पावडर आणि ३५ हजार रुपये तसेच दोन आयफोन आढळले. पोलिसांनी हे सर्व आणि अ‍ॅक्टिव्हा जप्त केली. प्राथमिक चौकशीत मोहितने एमडीच्या तस्करीत आमिर मुकीमचा सहभाग असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आमिरलाही भल्या सकाळी अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर, पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक ढाकूलकर, गजानन निशितकर, राज चौधरी, संजय गिते, विजय लांडे आणि सचिन सोनवणे यांनी ही कामगिरी बजावली.साथीदार फरारमोहित आणि आमिर यांच्यासोबत एमडीची तस्करी करणारांची भली मोठी टोळी आहे. गुन्हे शाखेतील एका पोलिसासोबत मोहितचे मधूर संबंध आहे. सेटर म्हणून तो पोलीस ओळखला जातो. त्या पोलिसाच्या सहकार्यानेच मोहित कोकेननंतर एमडीच्या तस्करीकडे वळल्याचे बोलले जाते. दरम्यान, मोहित पकडला गेल्याचे कळताच त्याचे अनेक साथीदार पळून गेले. पुढच्या काही तासात त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करी