ठळक मुद्देदिवसा तापते कडकड उनरात्रीही जाणवते उष्णता
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरात पारा पुन्हा चढत असून शुक्रवारी उपराजधानीतील तापमान कमाल ४४.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. यामुळे एप्रिल महिन्याच्या उरलेल्या दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कडक उन्हासोबत आकाशात ढग होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वातावरण कोरडे राहून आकाशात ढग राहतील. यामुळे उकाड्याचा त्रास होऊ शकतो. विदर्भासह मध्य भारतात चंद्रपूर ४५.६ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात तापमान ४० डिग्रीच्या वर गेले. बुलडाणात कमाल तापमान ४१.५ डिग्री, ब्रह्मपुरीत ४४.३, अकोला, वर्धात ४४.२, यवतमाळ ४३.५, गडचिरोलीत ४३.४, अमरावतीत ४२.६, वाशिममध्ये ४२ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली.