शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

१५ रुपयात बसा नागपूरच्या मेट्रोत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:45 PM

नागपूरकरांना मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोची व्यावसायिक सेवा फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. खापरी ते सीताबर्डी १३ कि़मी. आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगर सहा कि़मी. असे दोन टप्पे राहणार आहे. पण प्रवाशांना मेट्रोत बसण्यासाठी दोन कि़मी.करिता १५ रुपये मोजावे लागणार आहे.

ठळक मुद्दे मेट्रो रेल्वेने प्रवास : शासनाच्या जीआरनुसार भाडे निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांनामेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोची व्यावसायिक सेवा फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. खापरी ते सीताबर्डी १३ कि़मी. आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगर सहा कि़मी. असे दोन टप्पे राहणार आहे. पण प्रवाशांना मेट्रोत बसण्यासाठी दोन कि़मी.करिता १५ रुपये मोजावे लागणार आहे.राज्य शासनाच्या २०१४ च्या जीआरनुसार महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात मेट्रोचे प्रवासी भाडे निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या दोन कि़मी.करिता १५ रुपये निर्धारित करण्यात आल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.नागपुरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्येच्या अनुषंगाने निर्माण झालेली वाहतूक समस्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून सुटणार आहे. शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पेट्रोलच्या किमतीपेक्षा अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करणे शक्य आहे. याशिवाय मानसिक त्रासाची झंझट राहणार नाही. आॅटोमोटिव्ह चौक ते खापरी (मिहान) आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गावर जवळपास ३९ कि़मी. अंतरावर मेट्रो धावणार आहे. दीक्षित यांनी नागपूर मेट्रो रेल्वेत प्रवास करण्यासाठी कि़मी.नुसार किती भाडे लागेल, याची माहिती दिली. त्यानुसार दोन कि़मी.पर्यंत १५ रुपये, चार कि़मी.पर्यंत १९ रुपये, सहा कि़मी.पर्यंत २३ रुपये, नऊ कि़मी.पर्यंत २८ रुपये, १२ कि़मी.पर्यंत ३० रुपये, १५ कि़मी.पर्यंत ३४ रुपये, १८ कि़मी.पर्यंत ३६ रुपये, २१ कि़मी.पर्यंत ३९ आणि २१ पेक्षा जास्त कि़मी.करिता ४१ रुपये भाडे लागणार आहे. हे भाडे दुचाकी वा चारचाकीने प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीपेक्षा अर्धे असल्याचा दावा दीक्षित यांनी केला आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर