आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्टअंतर्गत न्यू एअरपोर्ट स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंतच्या ५.४ कि.मी.च्या एटग्रेड सेक्शनमध्ये मार्च महिन्यापासून कमर्शियल रन सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी कमिश्नर आॅफ मेट्रो रेल्वे सेफ्टी टीमचा अंतिम दौरा फेब्रुवारीतच होणार आहे. या टीमने हिरवी झेंडी दाखविल्यास हैदराबाद मेट्रोद्वारे मागविण्यात आलेल्या ट्रेनच्या आधारे ‘जॉय राईड’ सुरू होईल. यासोबतच चीनमधून मेट्रो ट्रेनच्या डब्याची खेप सप्टेंबरपर्यंत नागपुरात पोहोचण्याची शक्यता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्य निदेशक बृजेश दीक्षित यांनी व्यक्त केली आहे.नागपूर मेट्रो प्रोजेक्टसाठी मेट्रो ट्रेन खरेदीसाठी जारी करण्यात आलेल्या टेंडरमध्ये भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड आणि टीटागढ वॅगन्स लि.ला चीनची मेट्रो ट्रेन निर्माता कंपनी ‘चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन’(सीआरआरसी) ने मागे सोडत हे कंत्राट मिळवले. ८५१ कोटींच्या या कंत्राटाअंतर्गत सीआरआरसी नागपूर मेट्रो प्रोजेक्टसाठी क्रमश: ३-३ कोच असलेली २३ मेट्रो ट्रेन म्हणजे ६९ मेट्रो कोचची पूर्तता केली जाईल.एका कोचची किंमत १०.४१ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. यात वार्षिक देखरेख शुल्काचाही समावेश आहे. ट्रेन नागपूरला येण्याबाबत लोकमतने बृजेश दीक्षित यांना विचारले असता ते म्हणाले, आधी जूनपर्यंत चीनमधून मेट्रो ट्रेन शहरात येणार असल्याचे सांगितले जात होते.परंतु आता नवीन शेड्यूलनुसार ट्रेनची ही खेप सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे.
चीनमधून सप्टेंबरपर्यंत येणार नागपूर ‘मेट्रो’चे डबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 11:24 AM
नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्टअंतर्गत न्यू एअरपोर्ट स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंतच्या ५.४ कि.मी.च्या एटग्रेड सेक्शनमध्ये मार्च महिन्यापासून कमर्शियल रन सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देमार्चमध्ये कमर्शियल रन नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार खापरी-बर्डी सेक्शनचे काम