शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

ताशी ९० कि.मी. वेगाने धावली ‘नागपूर मेट्रो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 10:26 AM

नागपूर मेट्रो रेल्वे एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान पाच कि़मी. अंतर ताशी ९० कि़मी. वेगाने धावली.

ठळक मुद्देप्रवाशांच्या वजनाएवढ्या ६३ टन रेतीचा उपयोग पाच कि.मी. प्रायोगिक चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान पाच कि़मी. अंतर ताशी ९० कि़मी. वेगाने धावली. संशोधन डिझाईन आणि स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन (आरडीएसओ) यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि लखनौ येथील आरडीएसओचे १२ अधिकारी व तंत्रज्ञांच्या उपस्थितीत मेट्रोचे प्रायोगिक परीक्षण (ट्रायल रन) रविवारी दुपारी यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि वरिष्ठ संचालक उपस्थित होते.पत्रपरिषदेत दीक्षित म्हणाले, परीक्षणानंतर ताशी २५ कि.मी. वेगाने धावणारी मेट्रो आता ९० कि.मी. वेगाने धावणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून ‘आरडीएसओ’चे अधिकारी नागपूर मेट्राचे ताशी ५० कि.मी., ६५ कि.मी. आणि ८० कि.मी. वेगाने आॅसिलेशन ट्रायल घेत आहेत. परीक्षादरम्यान रेल्वेच्या विविध भागात सेन्सर्स बसविले होते. यामुळे मिळणाऱ्या सर्व माहितीचे संकलन करून ‘आरडीएसओ’चे अधिकारी एक अहवाल तयार करून रेल्वे बोर्डाकडे सादर करतील. यानंतर अहवालाचा सखोल अभ्यास करून त्या आधारावर पुढील रूपरेषा आखण्यात येणार आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, रायडरशिप इंडेक्स, आपात्कालीन ब्रेक व्यवस्था आदींची अत्याधुनिक उपकरणांची तपासणी करण्यात आली. रेल्वेच्या मानकानुसार रायडरशिप इंडेक्स ३ असायला हवा. ट्रायल रनदरम्यान २.२ होता. त्यामुळे मेट्रो ९० कि.मी. वेगाने धावण्यास सज्ज असल्याचे दीक्षित म्हणाले.मार्च-२०१९ पर्यंत मेट्रो प्रत्यक्ष धावणारखापरी ते मुंजे इंटरचेंज या मार्गावर मार्च-२०१९ पर्यंत मेट्रो प्रत्यक्ष धावणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. मेट्रोचे अजनी ते सोनेगाव पोलीस ठाण्यापर्र्यंत डबलडेकर पुलाचे काम सुरू आहे. प्रथम मेट्रोच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. डबलडेकरचा संपूर्ण बांधकाम फंड आल्यानंतर जून-जुलै २०१९ पर्र्यंत पूर्ण होईल. या पुलाचे डिझाईन अनोखे असून बांधकामादरम्यान लोकांना त्रास होत नाही. डबलडेकर पुलाचा उपयोग मनीषनगर येथील नागरिकांना होणार आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगवर लोखंडी पूल तयार करण्यात येत आहे. भूमिगत मार्गाचे काम सुरू आहे. असेच पूल विजय टॉकीज आणि गड्डीगोदाम येथे होणार आहेत. पारडी येथे पारडी स्टेशन आणि एचएचएआयच्या पुलाचे काम एकत्रितरीत्या सुरू आहे.

टॅग्स :Metroमेट्रो