लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारे चौथे एअरपोर्ट स्टेशन अर्बन आर्किटेक्ट थीमवर राहणार आहे. स्टेशनचे कॉनकोर्स तयार असून प्लॅटफॉर्मच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.महामेट्रोच्या चौथ्या स्टेशनची निर्मितीनागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाअंतर्गत एअरपोर्ट साऊथ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंतच्या पिलरवरील ट्रॅकचे बुलंदद्वारे यशस्वी परीक्षण करण्यात आले. यानंतर आता या मार्गावरील स्टेशनचे बांधकामदेखील वेगाने पूर्ण केले जात आहे. खापरी, न्यू-एअरपोर्ट आणि एअरपोर्ट साऊथ या तीन मेट्रो स्टेशननंतर आता हे चौथे मेट्रो स्टेशन तयार होत आहे. लवकरच स्टेशनचे बांधकाम पूर्ण होईल आणि खापरी ते एअरपोर्टपर्यंत ६.५ कि.मी.चा ट्रॅक तयार असेल. एअरपोर्ट मेट्रो स्टेशनच्या कार्याचा आढावा घेतला असता याठिकाणी स्टेशनचे प्रारंभिक बांधकाम पूर्णपणे तयार झाले असून इतर कार्यदेखील निर्माणाधीन आहेत.सामान्य आणि दिव्यांगांसाठी सुविधापर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक वाटेल, अशा उद्देशाने हे स्टेशन बनविण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर अंदाजे ५०० मीटर अंतरावर वर्धा महामार्गाच्या मध्यभागी पिलरवर हे आधुनिक स्टेशन तयार होत आहे. एअरपोर्ट स्टेशन हे अर्बन आर्किटेक्ट थीमवर आधारित आहे. संपूर्ण स्टेशन एकूण २२ पिलरवर उभे राहणार आहे. २२३० वर्गमीटर इतक्या जागेवर एअरपोर्ट स्टेशन उभारण्यात येत आहे. स्टेशनची लांबी ८१ मीटर आणि रुंदी २६ मीटर आहे. व्हायाडक्ट एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरील कॉनकोर्स तयार झाले आहे. याठिकाणी स्टेशन कंट्रोल रूम, तिकिट काऊंटर, शौचालयागृह व इतर संबंधित केंद्र तयार केले जात आहे. तसेच कॉनकोर्सवरील प्लॅटफॉर्म बनविण्याचे कार्य सुरू आहे. याशिवाय प्रवाशांच्या सेवेसाठी पार्किंगची व्यवस्था स्टेशन परिसरात केली जाणार आहे. इतर मेट्रो स्टेशनप्रमाणे या स्टेशनवरदेखील दिव्यांग, नेत्रहीन, महिलांसाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय स्टेशनलगतची महा मेट्रोची एन्सिलरी इमारतदेखील तयार होत आहे. ही इमारत व्यावसायिक हेतूने वापरण्यात येणार आहे.
अर्बन आर्किटेक्ट थीमवर राहणार नागपूर मेट्रो ‘एअरपोर्ट स्टेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 11:44 PM
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारे चौथे एअरपोर्ट स्टेशन अर्बन आर्किटेक्ट थीमवर राहणार आहे. स्टेशनचे कॉनकोर्स तयार असून प्लॅटफॉर्मच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.
ठळक मुद्देमहामेट्रो : प्लॅटफॉर्म बांधकामाला सुरुवात