नागपूर : तडीपार असताना शहरात कोयता घेऊन फिरणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. दिपक उर्फ मल्लू मदन पासवान (२४, रा. अमरनगर वस्ती, एमआयडीसी हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांचे पथक गुन्हेगाराच्या शोधात सोमवारी २७ मे रोजी रात्री ८.४० वाजता गस्त घालत होते. तेवढ्यात आयसी चौकातील देशी दारुच्या भट्टीजवळ आरोपी मल्लू पोलिसांना पाहून पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक ४०० रुपये किमतीचा स्टीलचा कोयता आढळला. आरोपी मल्लूचा अभिलेख तपासला असता त्याला झोन १ च्या पोलिस उपायुक्तांनी १३ सप्टेंबर २०२३ पासून शहरातून १ वर्षासाठी तडीपार केल्याचे आढळले. तडीपार असताना घातक शस्त्र घेऊन फिरल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम ४/२५, भारतीय हत्यार कायदा सहकलम १४२, १३५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी मल्लूला अटक करण्यात आली.
तडीपार मल्लू कोयता घेऊन फिरला, पोलिसांच्या जाळ्यात अडकला
By दयानंद पाईकराव | Published: May 28, 2024 8:34 PM