शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नागपूर ‘मॉडेल’ देशात सर्वोत्तम होणार

By admin | Published: November 01, 2016 2:25 AM

राज्याच्या विकासात तंत्रज्ञानाचा मौलिक वाटा राहणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींना ‘डिजीटल’ करत

नागपूर : राज्याच्या विकासात तंत्रज्ञानाचा मौलिक वाटा राहणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींना ‘डिजीटल’ करत असतानाच नागपूरसारख्या मोठ्या शहरांनादेखील तंत्रज्ञानासोबत जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागपूरच्या विकासासाठी माहिती व तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली उभारण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाची कामाची गती व पारदर्शकता वाढेल. नागपूरचे हे ‘मॉडेल’ देशात सर्वोत्तम होणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सोमवारी सायंकाळी ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.अनिल सोले, आ.सुधाकर देशमुख, आ.सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित होते. नागपुरात ‘मेट्रो’चे काम गतीने सुरू आहे. नागपूर विमानतळाची नवीन धावपट्टीदेखील लवकरच तयार होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी चार कंपन्यांकडून निविदा आलेल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूर-मुंबई ‘कम्युनिकेशन’ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील ५२ टक्के जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. पुढील महिनाभरात उर्वरित जमिनीचेदेखील अधिग्रहण होईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईप्रमाणे नागपुरातदेखील वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना ‘स्मार्ट चालान’ पाठविण्यात येत आहे. या प्रणालीला गतिमान करण्यात येणार असून नियम तोडून घरी पोहोचण्याअगोदर ‘चालान’ पोहोचले असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) शंकरनगर चौक झाला ‘स्मार्ट’ ४मुंबईप्रमाणेच नागपुरातदेखील महत्त्वाच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ लावण्यात येणार आहेत. नागपुरातील विविध रस्त्यांनादेखील ‘स्मार्ट’ करण्यात येणार आहे. याअंतर्गतच शंकरनगर चौक ‘लाईव्ह’ झाला आहे. येथे ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आले असून ‘वायफाय स्ट्रीट’वरदेखील लवकरच काम सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.