नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि अनेक दिवसांपासून होत असलेल्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस बडनेरा येथे, मदुराई-चंडीगड-मदुराई एक्स्प्रेस चंद्रपूरला, हैदराबाद-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस भांदक येथे आणि अजनी-अमरावती एक्स्प्रेस सिंदी येथे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस ३१ मार्चपासून बडनेरा रेल्वेस्थानकावर पहाटे ४.५३ वाजता येऊन ४.५५ वाजता सुटेल.
रेल्वेगाडी क्रमांक १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस १ एप्रिलपासून बडनेरा रेल्वेस्थानकावर रात्री १०.४८ वाजता येऊन १०.५० वाजता सुटेल.
रेल्वेगाडी क्रमांक १२६८७ मदुराई-चंडीगड एक्स्प्रेस २९ मार्चपासून चंद्रपूरला रात्री ११.३८ वाजता येऊन ११.४० वाजता सुटेल.
रेल्वेगाडी क्रमांक १२६८८ चंदीगड-मदुराई एक्स्प्रेस ३१ मार्च पासून चंद्रपूर रेल्वेस्थानकावर सकाळी ११.३७ वाजता येऊन ११.३९ वाजता सुटेल. रेल्वेगाडी क्रमांक १२७२१ हैदराबाद-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ३१ मार्चपासून भांदक रेल्वेस्थानकावर ६.३९ वाजता येऊन ६.४० वाजता सुटेल.
१२७२२ हजरत निजामुद्दीन-हैदराबाद एक्स्प्रेस ३१ मार्चपासून भांदक रेल्वेस्थानकावर सायंकाळी ७.१२ वाजता येऊन ७.१३ वाजता सुटेल. रेल्वेगाडी क्रमांक १२११९ अमरावती-अजनी एक्स्प्रेस ३१ मार्चपासून सिंदी रेल्वेस्थानकावर सकाळी ७.२८ वाजता येऊन ७.२९ वाजता सुटेल. तसेच रेल्वेगाडी क्रमांक १२१२० अजनी-अमरावती एक्स्प्रेस ३१ मार्चपासून सिंदी रेल्वेस्थानकावर सायंकाळी ७.०४ वाजता येऊन ७.०५ वाजता सुटेल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
..................