लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपमहापौर मनीषा कोठे व शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका शाळांची पाहणी केली होती. यावेळी अनियमितता व बेजबाबदारपणा निदर्शनास आला होता. यासंदर्भात शाळा निरीक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी महापालिका प्रशासनातर्फे याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.कोठे व दिवे यांनी गिट्टीखदान शाळा व एकात्मतानगर शाळेचा आकस्मिक पाहणी दौरा केला होता. यावेळी उपमहापौरांनी अनियमिततेला जबाबदार असलेल्या शिक्षकांवरनिलंबन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने झोनचे शाळा निरीक्षक धनराज दाभेकर, प्रभारी मुख्याध्यापक देवमन जामगडे, गिट्टीखदान मराठी प्राथमिक शाळेच्या सहा.शिक्षिका रेवती कडू, सहा.शिक्षिका ललिता गावंडे व शारदा खंडारे आदींना निलंंबित केले आहे. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु या अधिकारी व शिक्षकांनी दिलेली कारणे समाधानकारक नसल्याने विभागाने ही कारवाई केली.विद्यार्थी अनुपस्थित असूनही त्यांची हजेरी दाखवणे, शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण न करणे, वह्या-पुस्तके, व्यवसायमाला यामध्येही गोंधळ असणे, पहिल्या सत्राचा निकाल न लावणे असे धक्कादायक प्रकार समोर आले होते. यावर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून कारवाईचे निर्देश दिले होते.
नागपूर मनपा प्रशासनाची कारवाई : शाळा निरीक्षकांसह पाच शिक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 8:11 PM
उपमहापौर मनीषा कोठे व शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका शाळांची पाहणी केली होती. यावेळी अनियमितता व बेजबाबदारपणा निदर्शनास आला होता. यासंदर्भात शाळा निरीक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
ठळक मुद्देउपमहापौरांच्या शाळा पाहणी दौऱ्यात आढळली अनियमितता