लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त आज सोमवारी १६ मार्चला वर्ष २०१९ -२०२० चा सुधारित तर २०२०-२०२१ चा प्रस्तावित अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करणार आहेत. उत्पन्नाचा विचार करता स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला ३० ते ३५ टक्के कात्री लागणार आहे. यामुळे प्रशासनाच्या उत्पन्नात फारशी वाढ शक्य नसतानाही लोकप्रतिनिधी फुगीर अर्थसंकल्प कशासाठी सादर करतात. असा प्रश्न निर्माण झाला आहे.स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी वर्ष २०१९ -२०२० चा ३१९७.६० कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला होता. याला कात्री लावून २४०० ते २५०० कोटीवर आणण्याचे संकेत आयुक्तांनी आधीच दिले होते. त्यामुळे सत्तापक्षाने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ज्या योजना तयार केल्या होत्या, शहरातील नागरिकांना आश्वासन दिले होते. त्यावर पाणी फिरणार आहे. आधीच मनपाचा आस्थापना खर्च ५० टक्केहून अधिक आहे. याचा विचार करता ७०० ते ८०० कोटी शिल्लक राहतात. त्याला कात्री लागल्यास प्रस्तावित योजना कागदावरच राहणार आहेत.
सिमेंट रोडला ब्रेक?सिमेंट काँक्रिट रस्त्यांवर होत असलेल्या अतिरिक्त खर्चाबाबत आयुक्त संतुष्ट नाहीत. तसेच ४५० कोटींहून अधिकची देणी देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद के ली जाईल. यामुळे सिमेंट रोडसह अनेक प्रस्तावित योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.