शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नागपूर मनपाने मुसक्या आवळताच कनक वठणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:25 PM

मनमानी बिल सादर करून २४ कोटी ६० लाख अतिरिक्त मिळवणाऱ्या कनक रिसोर्सेसकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करताच कचरा उचलण्याचे काम बंद करण्याची धमकी देऊन महापालिकेला वेठीस धरण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. परंतु या धमकीला न जुमानता महापालिका प्रशासनाने कनकला वठणीवर आणत अतिरिक्त रक्कम वसूल निर्णय घेतला. तसेच कचरा संकलनाचे काम बंद न करण्याची हमी घेतली.

ठळक मुद्देमनपा २४.६० कोटींची वसुली करणार : काम बंद न करण्याची दिली हमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनमानी बिल सादर करून २४ कोटी ६० लाख अतिरिक्त मिळवणाऱ्या कनक रिसोर्सेसकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करताच कचरा उचलण्याचे काम बंद करण्याची धमकी देऊन महापालिकेला वेठीस धरण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. परंतु या धमकीला न जुमानता महापालिका प्रशासनाने कनकला वठणीवर आणत अतिरिक्त रक्कम वसूल निर्णय घेतला. तसेच कचरा संकलनाचे काम बंद न करण्याची हमी घेतली.कनकला अतिरिक्त देण्यात आलेल्या रकमेसंदर्भात आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी सोमवारी बैठक घेतली. यात प्रामुख्याने दोन मुद्यांवर चर्चा झाली. पहिला कनकची काम करण्याची तयारी आहे की नाही आणि दुसरा अतिरिक्त रक्कम परत करणार की नाही. या दोन्ही मुद्यावर कनकने सहमती दर्शविली. कनकच्या मानमानी विरोधात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आयुक्तांनी याची दखल घेत आरोग्य विभागाची तातडीची बैठक आयोजित केली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, आरोग्य अधिकारी(स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह कनक रिसोर्सेसचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.कनककडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यावर चर्चा झाली. आयुक्तांनी ठोस भूमिका घेत अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला. सोबतच कचरा उचलण्याचे काम बंद करणार नाही, अशी हमीही घेतली. काम बंद करावयाचेच असेल तर महापालिकेला पूर्वसूचना द्यावी. पर्यायी व्यवस्था करण्यास महापालिका सक्षम असल्याचे कनकला बजावले. सूत्रांच्या माहितीनुसार कनकने पहिल्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली होती परंतु आज नरमाईचे धोरण स्वीकारले.दर महिन्याच्या बिलातून वसुलीगेल्या दोन महिन्याचे नऊ कोटीचे बिल महापालिकेने थांबविले आहे. ही रक्कम अतिरिक्त रकमेत समायोजित केली जाणार आहे. तसेच उर्वरित १५.६० कोटींची रक्कम कनकच्या दर महिन्याच्या बिलातून वसूल केली जाणार आहे. कनकचा कंत्राट १५ फेबु्रवारी २०१९ पर्यंत असल्याने दर महिन्याला १ कोटी ५० लाख बिलातून कपात करण्यात येणार आहे.१३०६ प्रति टन मोबदलाकनकने कंत्राट घेतला तेव्हा प्रति टन ४४९ रुपये दर ठरला होता. यात दर तीन महिन्यांनी वृद्धी केली जात होती. कर्मचाऱ्यांचे वेतन वाढल्यानंतर कनकला प्रति टन १०३३ रुपये प्रति टन मोबदला दिला जात होता. मात्र कनकने प्रति टन १६०६ रुपयांची मागणी केली होती. महापालिका प्रशासनाने १३०६ रुपये प्रति टन दराने मोबदला देण्याचे बैठकीत मान्य केले.कचरा संकलनावर परिणाम नाहीकचरा संकलनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यात कचरा संकलनाचे काम सुरू ठेवणे व अतिरिक्त उचल केलेली रक्कम वसूल करण्यावर चर्चा झाली. हे दोन्ही मुद्दे कनक रिसोर्सेसने निर्माण केले होते. त्यामुळे शहरातील कचरा संकलनावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली. तसेच कनकने उपस्थित केलेला कर्मचाऱ्यांच्या वाढीव भत्त्याच्या मागणीचा विषय स्थायी समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न