शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपूर मनपाला ‘टेन्शन’ ‘टॅक्स’ वसुलीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 12:29 PM

नागपूर महापालिका प्रशासनाने अधिकाधिक टॅक्स वसुली व्हावी, यासाठी कंबर कसली आहे.

ठळक मुद्देप्रशासन कामाला लागले सुटीच्या दिवशी कर भरण्याची सुविधाआयुक्त मुंढेंच्या निर्देशामुळे वसुलीवर लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आर्थिक अडचणीत आहे. ८०० कोटींहून अधिक तातडीची देणी चुकती करायची आहेत. दुसरीकडे मालमत्ता कराची थकबाकी शेकडो कोटींमध्ये आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी यापूर्वीही महापालिकेने प्रयत्न केले, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. यावर्षीही प्रयत्न सुरू आहेत. आता शिल्लक एक महिन्यात अधिकाधिक टॅक्स वसुली व्हावी, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. टॅक्स भरण्याकरिता सुविधा व्हावी, यासाठी सुटीच्या दिवशी झोन कार्यालयात टॅक्स भरण्याची सुविधा राहणार आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी वर्ष २०१९-२० मध्ये ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. तर वर्ष २०१८-१९ मध्ये वीरेंद्र कुकरेजा यांनी २९४४ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. अंदाजानुसार २०१९-२० या वर्षात प्रयत्न करूनही महापालिकेच्या तिजोरीत २४०० कोटी जमा होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ८०० कोटींची कपात होणार असल्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.शहरात विकास कामे व्हावीत, यासाठी आयुक्त प्रयत्नशील आहेत. परंतु यासठी निधीची उपलब्धता तितकीच महत्त्वाची असल्याने तिजोरीत महसूलही जमा करावयाचा आहे. त्यांनी सर्व विभागांना वसुलीवर लक्ष्य केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलावात काढण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाणीपट्टी वसुलीसाठीही अशीच कारवाई सुरू आहे. थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासोबतच जप्ती मोहीम राबविली जात आहे.वर्ष २०१९-२० मध्ये २३८८ कोटी खर्चाचा अंदाज आहे तर, उत्पन्न २४०० कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच स्थायी समितीचा अर्थसंकल्प व वास्तविक उत्पन्न यात दरवर्षी २० टक्के तफावत आहे. त्यातच मनपाकडे एकूण ४९५.५१ कोटींची देणी थकीत आहे. यावरून स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ८०० कोटींची कपात होण्याची शक्यता आहे. परंतु आयुक्तांच्या अर्थसंकल्पानंतर वस्तूस्थिती पुढे येणार आहे.महिनाभरात धडाकेबाज निर्णयमनपा प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिनाभरात अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. यात मनपाच्या चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कंत्राटदार जे. पी. एंटरप्रायजेसच काळ्या यादीत समावेश, कुख्यात संतोष आंबेकरचा अनधिकृ त बंगला तोडला, मनपाचे कर संग्राहक आनंद फुलझेले यांना निलंबित केले. शहरातील अवैध आठवडी बाजारांवर मोठी कारवाई, हिवताप निरीक्षक संजय चमके बडतर्फ, सिमेंट रस्त्याच्या कामात दिरंगाईमुळे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांना नोटीस, शहरातील रोजचे १२० पाणी टँकर बंद, आर्थिक टंचाईमुळे मंजूर विकास कामांना स्थगिती व शिस्तीमुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्क्याच्या आसपास गेली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका