लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :उपराजधानीचा दर्जा असल्यामुळे दिवाळीत नागपूर मनपाला १५० कोटी रुपयांचा विशेष फंड मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मिळाला आहे. यादरम्यान १७५ कोटी रुपये देण्याची घोषणा सत्तापक्षाने केली होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही रक्कम लवकरच जारी करण्याचे आश्वासन दिले होते. अशा स्थितीत मनपाची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याचे दिसून येत आहे. आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी विशेष अनुदानासाठी विस्तृत अहवाल तयार करून थेट राज्य सरकारला पाठविला होता. त्यानंतर त्यांनी अनेकदा पाठपुरावा करून संबंधित निधी मनपाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अखेर दिवाळीपूर्वी त्यांना यश आले. पूर्वी अनेक अटी लादण्यात आल्या होत्या. नंतर शिथिल करण्यात आल्या. लवकरच संबंधित राशी मनपाला मिळण्याचे संकेत कुकरेजा यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात सकारात्मक संकेत दिले आहेत.कंत्राटदारांच्या थकीत बिलाचे देयकुकरेजा यांनी सांगितले की, दिवाळीत कंत्राटदारांना १५० कोटी रुपयांची थकीत रक्कम दिली आहे. त्यानंतर १३२ कोटी आणि ५० कोटी रुपयांच्या थकीत बिलाची रक्कम अदा करण्यास सांगितले आहे. त्यावर प्रशासनाने अंमलबजावणी केली आहे. सध्या काहीच थकीत रक्कम द्यायची असून तो कामाचा एक भाग आहे.
नागपूर मनपाला लवकरच मिळणार १७५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:52 AM
उपराजधानीचा दर्जा असल्यामुळे दिवाळीत नागपूर मनपाला १५० कोटी रुपयांचा विशेष फंड मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मिळाला आहे. यादरम्यान १७५ कोटी रुपये देण्याची घोषणा सत्तापक्षाने केली.
ठळक मुद्दे मनपाला मिळाला १५० कोटींचा विशेष फंड : थकीत बिलाचे देय