शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड निधीत कपात नाही; नगरसेवकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:36 AM

महापालिकेच्या स्थायी समितीने सन २०१८-१९ या वर्षाचा सादर केलेला २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प व प्रत्यक्ष उत्पन्न यात फारशी तफावत नाही.

ठळक मुद्देप्रभागातील विकास कामांना फटका नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीने सन २०१८-१९ या वर्षाचा सादर केलेला २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प व प्रत्यक्ष उत्पन्न यात फारशी तफावत नाही. जमा होणारा महसूल विचारात घेता, आयुक्त अभिजित बांगर यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींना ३० टक्के कात्री लावण्याचे आदेश जारी केले आहेत. परंतु यात नगरसेवकांच्या हक्काच्या वॉर्ड निधीत कोणत्याही स्वरूपाची कपात करण्यात आलेली नाही. यामुळे प्रभागातील विकास कामांवर कपातीचा परिणाम होणार नाही.महापालिकेचे वास्तव उत्पन्न व खर्च विचारात घेता, अर्थसंकल्पातील तरतुदींना ३० टक्के कात्री लावण्याचे आदेश आयुक्तांनी नुकतेच जारी केले आहेत. यात नगरसेवकांच्या वॉर्ड निधीचाही समावेश असल्याची नगरसेवकांची ओरड होती. विरोधी पक्षनेत्यांसह अनेक नगरसेवकांनी यावर नाराजी व्यक्त करून कपात मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र अशाप्रकारची कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.मावळत्या वित्त वर्षाच्या अखेरच्या ४७ दिवसात महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित उत्पन्नाच्या जवळपास महसूल जमा होण्याची शक्यता आहे. वॉर्ड निधीतून वर्षाला २१ लाखांच्या फाईल मंजूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना आहे. या निधीला कात्री लावण्याचा प्रश्नच नसल्याचे अभिजित बांगर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मात्र महापालिकेच्या अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत महसूल तिजोरीत जमा होण्याची शक्यता नसल्याने, खर्चाला ३० टक्के कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रशासकीय मंजुरी व कार्यादेशावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

आयुक्तांचा अर्थसंकल्प लवकरचमहापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा सुधारित तर २०१९-२० या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प आयुक्त लवकरच स्थायी समितीला सादर करणार आहेत. यात ३१ मार्चपर्यंत अपेक्षित उत्पन्न व खर्च याचे वित्तीय समायोजन केले जाणार आहे. स्थायी समितीचा अर्थसंकल्प व आयुक्तांचा अर्थसंकल्प यात २० ते ३० टक्के निधीचा फरक राहण्याची शक्यता आहे. याचा विचार करूनच खर्चाला३० टक्के कात्री लावण्यात आली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका