शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नागपुरातील नगरसेवक बंटी शेळके यांचे सदस्यत्व धोक्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:05 AM

महापालिका सभागृहात गोंधळ घालून कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव आगामी ५ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत आणण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देचौकशीत दोषी असल्याचे स्पष्ट : सर्वसाधारण सभेत कारवाईचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेवटर्कनागपूर : महापालिका सभागृहात गोंधळ घालून कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव आगामी ५ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत आणण्याची शक्यता आहे.३ फे ब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहाबाहेर आशा कार्यकर्त्यांची निदर्शने सुरू होती. आंदोलकांना बंटी शेळके यांनी सभागृहात घुसवले होते. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले होते. यासंदर्भात आशा कार्यक र्त्यांनी लेखी तक्रार केली होती. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आयुक्तांनी शेळके यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. परंतु शेळके यांच्या दिलेल्या स्पष्टीकरणामुळे प्रशासनाचे समाधान झालेले नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तत्कालीन अपर आयुक्त रिजवान सिद्दीकी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. सिद्दीकी यांच्या चौकशीत शेळके दोषी आढळून आले आहेत. कायदेतज्ज्ञांचा सल्ला व महापालिका कायद्याचा अभ्यास केल्यानंतर शेळके यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव सभागृहात ठेवला जाणार आहे.शेळके यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सत्तापक्षातील काही सदसय आग्रही आहेत. या प्रकरणापूर्वी शेळके यांनी सभागृहात घंटा वाजवून सभागृहाच्या कामकाजात बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शेळके यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला अनेक तक्रारी दाखल आहेत.तीन मुले असल्याचा माजी नगरसेवक बंडू तळवेकर, इफ्तेखार अशरफू निशा यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने अनेक नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झालेले आहे. परंतु कामकाजात अडथळा निर्माण करण्यावरुन मागील काही वर्षात नगरसेवकांवर कारवाई झालेली नाही.सभागृहाला कायदेशीर कारवाईचे अधिकारमहापालिका कायद्याच्या कलम-१३ अंतर्गत नगरसेवक बंटी शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सभागृहाचा एखादा सदस्य गैरवर्तन करून सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण करीत असेल तर कायद्यानुसार त्याचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पारित करण्याचा अधिकार सभागृहाला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाईल. यावर राज्य सरकारला निर्णय घ्यावयाचा आहे.भाजपात दोन मतप्रवाहसूत्रांच्या माहितीनुसार बंटी शेळके यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपात दोन मतप्रवाह आहेत. शेळके यांच्यावर कारवाई केली तर पक्षाची प्रतिमा मलीन होईल. त्यामुळे कठोर कारवाई नको, अशी काही नगरसेवकांची भूमिका आहे. तर भाजपाचे काही नगरसेवक शेळके यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी आग्रही आहेत.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर