लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत निधी मिळत नसल्याच्या तक्रारींवरून काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुरुवारी काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत विरोधी पक्षनेते गटाचे नेहा राकेश निकोसे, दिनेश यादव, परसराम मानवटकरही उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटनेता बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. यापासून सावध होत वनवे यांनी शुक्रवारी संबंधित तीनही नगरसेवकांची बैठक घेतली. यानंतर तिघांनीही आपला वनवे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे पत्र जारी केले.गटनेतेपदावरून पुन्हा एखदा काँग्रेसमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. वनवे हे सर्व नगरसेवकांना विश्वासात घेत नाही, त्यांचे प्रश्न ठोसपणे मांडत नाहीत. त्यामुळे नगरसेवकांना महापालिकेकडून पुरेसा निधी मिळत नाही, अशी तक्रार काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडे केली होती. यावर ठाकरे यांनी गुरुवारी नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीत नगरसेवकांनी संदीप सहारे यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या सभेत आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला. बैठकीत माजी मंत्री नितीन राऊत यांच्या गटाचे नेहा राकेश निकोसे, दिनेश यादव, परसराम मानवटकर हे तीनही नगरसेवक उपस्थित राहिल्यामुळे मुत्तेमवार विरोधी गोटात अस्वस्थता पसरली होती. तर सहारे यांनी नेमके याचे भांडवल करीत आपल्यासोबत १६ नगरसेवक असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा गटनेता निवडीसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच होण्याची चर्चा सुरू झाली होती.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वनवे यांनी आपल्या कक्षात नेहा निकोसे, दिनेश यादव व परसराम मानवटकर यांची बैठक घेतली. बैठकीनंतर तीनही नगरसेवकांनी आपला वनवे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे पत्र जारी केले. गुरुवारच्या बैठकीत निधी वितरणात होत असलेल्या भेदभावाबाबत चर्चा झाली. गटनेता बदलण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही, असे मानवटकर यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नगरसेवक रमेश पुणेकर, नितीन साठवणे सक्रिय होते.बैठक घेण्याचा अधिकार नाही : वनवे- महापालिलकेतील काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे म्हणाले, काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेऊन महापालिकेच्या ससभागृहात मुद्दा उचलण्याची जबाबदारी सोपविण्याचे अधिकार विकास ठाकरे यांना नाहीत. आपण गटनेते आहोत. ज्या तीन नगरसेवकांचे समर्थन असल्याचा दावा केला जात आहे त्यांनी गटनेता म्हणून आपपल्यावर पूर्ण विश्वास असल्याचे लेखी दिले आहे. त्यामुळे गटनेता निवडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.नगरसेवकांच्या तक्रारींवर घेतली बैठक: ठाकरे- काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, महापालिकेत काँग्रेस नगरसेवकांना निधी देण्यात भेदभाव केला जात आहे. याबाबत काही नगरसेवकांनी आपल्याला फोन करून नाराजी व्यक्त करीत या विषयावर बैठक घेण्याची विनंती केली. पक्षाचा शहर अध्यक्ष म्हणून मी नगरसेवकांची बैठक बोलावली. तीत महापालिका प्रशासनाविरोधात रणनीती आखण्यात आली. ही गटनेता निवडीसाठी बैठक नव्हती. पण नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शहर अध्यक्ष म्हणून नगरसेकांची बैठक बोलाविण्याचा आपला अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर मनपातील गटनेत्यावरून काँग्रेसमध्ये पुन्हा रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 1:28 AM
महापालिकेत निधी मिळत नसल्याच्या तक्रारींवरून काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुरुवारी काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत विरोधी पक्षनेते गटाचे नेहा राकेश निकोसे, दिनेश यादव, परसराम मानवटकरही उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटनेता बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. यापासून सावध होत वनवे यांनी शुक्रवारी संबंधित तीनही नगरसेवकांची बैठक घेतली. यानंतर तिघांनीही आपला वनवे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे पत्र जारी केले.
ठळक मुद्देनिकोसे, यादव, मानवटकरांनी दिले वनवेंच्या समर्थनार्थ पत्र : विरोधी गटही सक्रिय